Lok Sabha Election 2024 : शिवसंकल्प यात्रेतून शिंदे गट उडविणार प्रचाराचा धुराळा

Shiv Sena : खासदार कृपाल तुमानेंनी सांगितला पक्षाचा लोकसभा प्रवासाचा ‘रोडमॅप’
Shiv Sena
Shiv SenaSarkarnama
Published on
Updated on

Nagpur : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटानेही विदर्भात जोरदार तयारी सुरू केली आहे. जानेवारी अखेरीस शिवसेना शिवसंकल्प यात्रेच्या माध्यमातून विदर्भात निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा करणार आहे. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी रविवारी (ता. 7) नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना हे संकेत दिलेत.

प्रचारासाठी व मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी शिवसेना शिवसंकल्प यात्रा काढणार आहे. पहिल्या टप्प्यात ही यात्रा राज्यातील दहा ठिकाणवरून जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात रामटेक ते वाशिम असा यात्रेचा ‘रोडमॅप’ राहणार आहे.

Shiv Sena
Nagpur : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करणार देशभरातील कॉलेजेसमध्ये ‘ब्रेन वॉशिंग’

27 जानेवारीला शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. शिवसंकल्प यात्रेचा दुसरा टप्पा 2 फेब्रुवारीला सुरु होईल. आतापर्यंत दहा मतदार संघांपैकी दोन मतदार संघांमध्ये सभा घेण्यात आल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात रामटेक, यवतमाळ, वाशिम, ठाणे, मुंबई, पालघर आणि कल्याण येथे यात्रा काढण्यात येणार आहे, असे खासदार तुमाने यांनी सांगितले.

आगामी निवडणूक भाजपकडून दहा जागांवर दावा करण्यात आला आहे. यासंदर्भात बोलताना तुमाने म्हणाले की, जागा वाटपाबद्दल अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. महायुतीमधील तीनही पक्षाचे नेते एकत्र बसून हा निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना व भाजपबद्दल जो निर्णय घेतील त्यानुसार लोकसभा निवडणुकीची व्यूहरचना ठरणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना खासदार तुमाने यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, केंद्र सरकारकडून राज्य सरकारला विविध विकास कामांसाठी भरघोस निधी मिळत असतो. मुख्यमंत्री या पदावर असल्याने केंद्राकडून हा निधी मिळविण्यासाठी शिंदे यांना दिल्लीला जावे लागते. आतापर्यंत राज्य सरकारने केंद्राकडून मोठ्या प्रमाणावर निधी आणला आहे. त्यातून महाराष्ट्राच्या विकासाची कामे जोरात सुरू आहेत. विरोधकांना आता कोणतेही काम शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे टीव्ही चॅनलवरील आपला टीआरपी कायम ठेवण्यासाठी ते बरळत असतात, अशी टीकाही त्यांनी केली.

लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात यश मिळणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जनतेच्या हिताच्या अनेक योजना राबविल्या आहेत. त्यामुळे जनतेमध्ये समाधान आहे. नुकत्याच झालेल्या तीन राज्याच्या विधानसभा निवडणुकीतून हे सिद्ध होते. त्यामुळे विरोधक कितीही दावे करीत असले तरी लोकसभा व विधानसभेत महायुतीलाच यश मिळेल, असा ठाम विश्वासही खासदार कृपाल तुमाने यांनी व्यक्त केला.

Edited by : Atul Mehere

Shiv Sena
Nagpur: सीबीआयने नागपुरात पकडले दोन अधिकारी, कोट्यवधींचे घबाड...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com