अजित पवारांना इन्कम टॅक्सची ना नोटीस, ना संपत्तीवर टाच!

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या संदर्भातील वृत्त फेटाळले आहे.
अजित पवार - किरीट सोमय्या
अजित पवार - किरीट सोमय्या सरकारनामा
Published on
Updated on

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आल्याचे सांगत या गोंधळात आणखी भर टाकली. प्रत्यक्षात तसे काहीच झाले नसल्याचे अजित पवार यांच्या वकिलांकडून स्पष्ट करण्यात आले.

या संदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना प्राप्त झालेली नाही. प्रसिद्धी माध्यमात येत असलेले वृत्त निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत, खोडसाळपणाचे आहे, असे स्पष्टीकरण अजित पवार यांचे वकील प्रशांत पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.

अजित पवार - किरीट सोमय्या
अजितदादा म्हणाले, ''पाहुण्यांचे काम सुरु आहे, ते गेल्यावर बोलेन;पाहा व्हिडिओ

या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसारीत होत असलेल्या बातम्यांचे खंडन करताना त्यांचे वकील प्रशांत पाटील म्हणाले की, अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच आलेली नाही किंवा त्यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आलेली नाही. आयकर विभागाकडून काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. त्या पत्राला योग्य ते उत्तर देण्यात येईल. प्रशासकीय आणि कायदेशीर मार्गाने योग्य ती कार्यवाही केली जाईल, असंही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रसिद्धीमाध्यमांनी वस्तुस्थिती तपासून बातम्या द्याव्यात व कुठलाही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com