
Yogesh Kadam’s Role in the Recommendation Process : कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यावरून मागील दोन दिवस राज्यांतील राजकारण ढवळून निघाले आहे. घायवळला शस्त्र परवाना देण्यासाठी विधिमंडळातील बड्या नेत्याकडून शिफारस केल्याने गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी परवाना देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा माजी मंत्री रामदास कदम यांनी केला आहे. त्यावरून वादळ उठले असतानाच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
शस्त्र परवाना प्रकरणात अजित पवार यांनी लक्ष घातलं असून त्यांनी याबाबत थेट पुण्याच्या पोलीस आयुक्तांना याबाबत विचारणा केली आहे. याबाबत मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितले की, जरी काहींनी शिफारस केलेली असली तरी सीपींनी शस्त्र परवाना दिलेला नाही, असे आयुक्तांनी सांगितले असल्याचे अजितदादांनी स्पष्ट केले. मी सीपींना सांगितले आहे, कोण कुठल्या गटाचं-तटाचं, पक्षाचं, जवळचा कार्यकर्ता असलं काही बघू नका. जर तिथं चूक असेल, कायदा हातात घेण्याचा प्रय़त्न करत असेल तर कारवाई करा, असे अजितदादा म्हणाले.
कायदा-सुव्यवस्था चांगली ठेवणे हे सरकारचे आणि पोलिसांचे काम आहे. मी त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप होऊ देणार नाही. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही तिघेही पंतप्रधानांच्या कार्यक्रमानिमित्त दोन दिवस एकत्रच होतो. त्यावेळीही हा विषय निघाला होता. त्यावेळीही मुख्यमंत्र्यांनीच हीच भूमिका मांडली की, अजिबात कुणाची फिकीर करायची नाही. ज्यांनी कुठं चुका केल्या असतील तर त्यांच्यावर रीतसर कारवाई करायची. या सगळ्याची चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर पुढची कारवाई करायची, असे मुख्यमंत्री म्हणाल्याचे अजितदादांनी सांगितले.
सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्याची योगेश कदम यांनी शिफारस केली, पण सीपींनी शस्त्र परवाना दिला नाही. कुणी शिफारस केली, याची चौकशी होईल, असे अजितदादांनी स्पष्ट केले. मागचं पोलीस रेकॉर्ड काय आहे, हे बघणे पोलिसांचे काम आहे, असेही अजितदादा म्हणाले. निलेश घायवळला पासपोर्ट कुणी दिला, कुणाची शिफारस होती, याची चौकशी करायला सांगितल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले.
अनेक लोकं येतात आणि सोबत फोटो काढतात. आपल्याला माहिती नसतं कोणं काय करतं. अलीकडं मोबाईलमध्ये फोटो, सेल्फी काढले जातात. एखाद्यासोबत फोटो असेल त्याचा संबंध असेलच असे नाही. पण चौकशी करत असताना फोन, संभाषण असे काही असेल कारवाई करायला हवी, असे अजित पवार यांनी काही गुंडांसोबत नेत्यांचे फोटो समोर येत असल्याच्या मुद्द्यावर भाष्य केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.