NCP Crisis : अजित पवारांची धाकधूक वाढली ; 'या' सर्व्हेनं शरद पवारांसाठी दाखविला आशेचा किरण !

Sharad Pawar & Ajit Pawar : अजित पवारांनी सध्या राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह आणि राष्ट्रीय अध्यक्षपदावर दावा ठोकला आहे.
Ajit Pawar, Sharad Pawar
Ajit Pawar, Sharad PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai : अजित पवारांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादीत उभी फुट पडली असून दोन गट निर्माण झाले आहेत. अजित पवारांनी थेट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर दावा ठोकला आहे. याचवेळी दोन्ही गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन देखील करण्यात येत आहे. याचदरम्यान, अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी(NCP)तील उभ्या फुटीनंतर थेट छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यातच म्हणजेच येवल्यात पहिली सभा घेत आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच यावेळी त्यांनी अजित पवारांसह भुजबळांवरही निशाणा साधला आहे. पण आता एबीपीचा सी व्होटर सर्व्हे समोर आला आहे. हा सर्व्हे अजित पवारांचं धाकधूक वाढविणारा असून शरद पवारांसाठी आशेचा किरण ठरत आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar
Sharad Pawar NCP Split : जुन्या मित्राचेच शरद पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले, "राष्ट्रवादी फुटीचा ठरवून केलेले..."

अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. याचवेळी एबीपीने सी व्होटर सर्व्हे केला आहे. या सर्व्हेवेळी शरद पवार (Sharad Pawar) सभा घेऊन महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष उभा करू शकतात का? वयाच्या 83 व्या वर्षी हे शक्य आहे का? असा सवाल राज्यातील जनतेला विचारण्यात आला होता. या सर्व्हेत शरद पवार यांच्या बाजूने निर्णायक कौल दिला आहे. एबीपीच्या सी व्होटर सर्व्हेनुसार 57 टक्के महाराष्ट्राची जनता ही शरद पवार यांच्या बाजूने उभी राहिली आहे. तर 37 टक्के जणांचं मत उत्तर नाही असं आलं आहे. याचवेळी 6 टक्के लोकांनी माहित नाही असं उत्तर दिलं आहे.

अजित पवारां(Ajit Pawar) नी सध्या राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह आणि राष्ट्रीय अध्यक्षपदावर दावा ठोकला आहे. तसेच याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासह विधानसभा अध्यक्षांकडे देखील याचिका दाखल केली आहे. हा अजित पवारांसाठी धक्का मानला जात आहे. आगामी काळात राष्ट्रवादी पक्ष कुणाचा पवारांकडे राहणार की अजित पवारांकडे पक्ष जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar
CM Eknath Shinde News : संकटात सापडलेल्या कुटुंबाच्या मदतीला मुख्यमंत्री धावले; ताफ्यातील रुग्णवाहिका दिलीच शिवाय...

येवल्यात पवारांचीच 'पॉवर'..?

शरद पवार यांनी येवला येथील सभेत छगन भुजबळांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. पवार म्हणाले, आज मी इथे का आलोय? मी इथं कोणाचं कौतुक करण्यासाठी आलो नाही किंवा कोणावर टीका करण्यासाठीदेखील आलो नाही. मी या ठिकाणी माफी मागण्यासाठी आलोय. मी मतदारांची माफी मागायला आलोय. माफी मागतोय कारण माझा अंदाज चुकला. माझे अंदाज फारसे चुकत नाहीत. पण इथं मात्र माझा अंदाज चुकला. माझ्या निर्णयामुळे तुम्हालाही यातना झाल्या असतील. तर माझं कर्तव्य आहे की, मी तुमची माफी मागितली पाहिजे असंही पवार म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.