Ajit Pawar On Shinde : '' तुम्ही नुसती दाढी कुरवाळत बसता, मी टीका करणारच ना...?''; अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले खडेबोल

NCP Political News : ''...तरीही एकहाती सत्ता का आणू शकलो नाही ? ''
Ajit Pawar On Shinde
Ajit Pawar On ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : ''मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की, सतत माझ्यावर तुम्ही टीका करता. पण तुम्ही काम करत नाही. केवळ दाढी कुरवाळत बसतात तुम्ही काम करा, मी कौतुक करेन अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खडेबोल सुनावले. तसेच गुवाहाटी, गोवा फिरुन आलात ते असले धंदे करायला आलात का?'' असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेस(Ncp) च्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद हाँल येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, 12- 12- लोडशेडिंगमधून आम्ही मुक्त केलं, तरीही आज लोडशेडींग का होत आहे. याचं उत्तर कोण देणार? आता गाड्यांवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिसतात. आता यांना आम्हाला बघायचं नाही तरी का दाखवता ? असा खोचक टोलाही पवार यांनी लगावला.

Ajit Pawar On Shinde
Sujay Vikhe News : सुजय विखेंनी वाढवले निलेश लंकेंचे टेन्शन; पारनेरमधील फोन करणारा कोण?

''...पण ते इतरांना ते निवडून आणू शकत नाही!''

सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या एखाद्या नेत्याला थेट महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी पोहचवू शकतो हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच करु शकतो. आता काहीजणांना मंत्रिपदं अनेक वर्ष मिळाली. आणि मंत्रिपदं नसताना संघटनेची जबाबदारी वेगवेगळ्या भागाची प्रत्येकानं उचलली पाहिजे. पण काही जण मंत्री होतात पण ते फक्त स्वत: ला निवडून आणू शकतात. पण इतरांना ते निवडून आणू शकत नाही असा टोलाही अजित पवारां(Ajit Pawar) नी यावेळी लगावला.

आपल्याला कुणाला विचारायला जायचंय का?

देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संविधानाने सर्व धर्म समभाव सांगितला आहे. त्यामुळें माझी कार्यकर्त्यांना सांगणं आहे. तुकारामाची गाथा निरूपण कार्यक्रम करावा. आपण कुठं कमी पडतो हे लक्षात घ्या. आपण विदर्भात कमी पडतो. अजूनही मुंबईचा अध्यक्ष झालेला नाही. आपल्याला काय कुणाला विचारायला जायचं आहे का?

Ajit Pawar On Shinde
Eknath Shinde On Pandharpur : शिंदे सरकारचा मोठा निर्णय : 74 कोटींच्या पंढरपूर देवस्थान मंदिर विकास आराखड्यास मान्यता

आपण आनंदाचा दिवस साजरा करत असताना चिंतन करायला हवं. आपण भाकरी फिरवायची ठरवली आहे तर ती फिरलीच पाहिजे. ज्याने आता घोषणा दिली त्याच्या वॉर्डत आपला नगरसेवक आहे का? नुसत्या मोठया घोषणा द्यायच्या अशी खरडपट्टीही पवार यांनी काढली.

'बीआरएस'कडं दुर्लक्ष करता येणार नाही.

वंचित आणि बीआरएसकडे दुर्लक्ष करता येणार नाही. प्रकाश आंबेडकर तेलंगणाला गेले होते. सध्या बीआरएसला त्यांचा पेक्षा आपल्या राज्यात जास्त इंटरेस्ट आहे. ते सर्वांना संपर्क साधत आहेत. त्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही असे अजित पवार म्हणाले.

राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर पवार म्हणाले?

राज्यात दंगल का घडतेय? त्याचा 'मास्टर माईंड' शोधून काढला पाहिजे. महिलांवर अत्याचाराच्या घटना समोर येतं आहे. धाराशिवमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केली. एका डॉक्टरचा व्हिडिओ समोर आला आहे. नेमकं काय झालं आहे समोर यायला हवं असं अजित पवार म्हणाले.

पुण्यात कोयता गँग त्रास वाढला आहे. पोलीस यंत्रणा चांगली आहे. परंतू, सरकार कमी पडत आहे. पोलिसांना मोकळीक मिळत नाही, त्यात हस्तक्षेप वाढत आहे. राज्याला शोभा देणाऱ्या या बाबी नाहीत अशा शब्दांत राज्यकर्त्यांचे कान अजित पवारांनी टोचले. (Latest Marathi News )

Ajit Pawar On Shinde
BRS News : महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना तेलंगणाने दिला आधार, महाराष्ट्र सरकार करतंय काय?

...तरीही एकहाती सत्ता का आणू शकलो नाही ?

२५ वर्षांच्या राजकीय कारकीर्द पाहता मला कधी दु:खं होतं की, ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये, अरविंद केजरीवालांनी दिल्ली आणि पंजाब, चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेश, के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात, आणि जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशात स्वत: च्या जीवावर सत्ता खेचून आणून मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली. पण या सगळ्यांमध्ये सर्वात उजवे तर शरद पवार आहेत. पण तरी कधी आपल्या स्वत: च्या जीवावर राज्यात एकहाती सत्ता खेचून आणू शकलो नाही आहे का असा खडा सवाल उपस्थित केला.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com