Jayant Patil : जयंत पाटील अजितदादांकडे! राष्ट्रवादीच्या नेत्याचा गौप्यस्फोट...

Jayant Patil will go to Ajit Dada's party : एका बाजूला हे नाट्य रंगले असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
Ajit Pawar, Jayant Patil
Ajit Pawar, Jayant PatilSarkarnama

Jayant Patil News : महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला प्रचंड असं यश मिळाला असून आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला दहा पैकी आठ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे या यशाचे नेमके मानकरी कोण यावरून कुठेतरी शरद पवार गटामध्ये वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे.

लोकसभेच्या विजयानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सेनापती म्हणून उल्लेख असणाऱ्या बॅनर्स पुण्यामध्ये लावण्यात आले होते. आमदार रोहित पवार यांनी याच बॅनरचा आधार घेत पक्षांमध्ये कोणीही सेनापती नाही, असे म्हणत जयंत पाटील यांच्यावर उपरोधिक टीका केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एका बाजूला हे नाट्य रंगले असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले, एखाद्या व्यक्तीचा जर अस्तित्व वाढलं तर काही लोकांना त्याचा त्रास होत असतो. जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या नेतृत्वात या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये दहा पैकी आठ जागा या शरद पवार गटाने जिंकल्या. यामुळे संबंध महाराष्ट्रात जयंत पाटील यांचा सन्मान होत असून त्यांच्या पतंगाचे दोर कापले पाहिजे असं काही लोकांना वाटत आहे. या विजयाचे श्रेय जयंत पाटील यांना मिळू नये म्हणून रोहित पवार यांच्याकडून राजकारण केले जातं असल्याचं आरोप मानकर यांनी केला आहे.

Ajit Pawar, Jayant Patil
NCP Sharad Pawar Vs Bjp : 'आमदार साडेचार वर्षात कुठंही दिसल्या नाहीत', कोणी केली ही टीका !

पुण्यामध्ये देखील जयंत पाटील यांचे सेनापती म्हणून बॅनर लागले होते. जर त्यांच्या नेतृत्वात निवडणूक जिंकली असेल तर त्यांचा सन्मान होणं आवश्यक होतं. मात्र असा सन्मान त्यांचा कुठेही झालेला पाहायला मिळाला नाही. ह्या विजयाचे श्रेय जयंत पाटील यांना द्यायला कोणी तयार नाही. रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यामध्ये जयंत पाटील यांना सन्मान देण्याचा कोणताही भाव दिसत नाही.

Ajit Pawar, Jayant Patil
Dispute In Mahavikas Aghadi : महाआघाडीच्या ऐक्यात मिठाचा खडा; कोल्हेंनी ‘ते’ विधान करताच शिवसेना नेते संतापले!

त्यामुळे जयंत पाटील यांना मला आता विनंती करायची आहे की आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं या ठिकाणी तुमचा अतिशय योग्य रीतीने सन्मान राखला जाईल. सध्याची परिस्थिती पाहतात त्या पाऊलवाटेवरती जयंत पाटील आहेत असं मला वाटत असल्याचे देखील मानकर यांनी सांगितलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com