Political News: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता या नव्या मंत्र्यांना बंगले आणि दालनाचे वाटप करण्यात आले आहे. नव्या मंत्र्यांना बंगले आणि दालनांचं वाटप करण्यात आलं असलं तरी खातेवाटप अद्याप झालेलं नाही. त्यामुळे खातेवाटप कधी होणार? आणि कोणाला कोणतं खातं मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार गेल्या एक वर्षभरापासून रखडलेला आहे. यातच आता राष्ट्रवादीही (अजित पवार गट) सत्तेत सहभागी झाली. त्यामुळे अजित पवारांसह नऊ मंत्र्यांकडे कोणत्या खात्याची जबाबदारी देण्यात येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. सरकारमध्ये नव्याने सामिल झालेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसाठी आज बंगले आणि दालनांचे वाटप करण्यात आले आहे.
कोणत्या मंत्र्यांना कोणता बंगला?
छगन भुजबळ यांना सिद्धगड बंगला, दिलीप वळसे पाटील यांना सुवर्णगड बंगला, हसन मुश्रीफ यांना विशालगड बंगला, धनंजय मुंडे यांना क-6 प्रचितगड बंगला, धर्मरावबाबा आत्राम यांना सुरुचि -3 बंगला, अनिल पाटील यांना सुरुचि 8 बंगला, संजय बनसोडे यांना सुरुचि 18 बंगला, असे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देण्यात आलेल्या बंगल्यांची नावे आहेत. आदिती तटकरे यांना देण्यात आलेल्या बंगल्याचे नाव अद्याप समोर आलेलं नाही. तर अजित पवार यांच्याकडे देवगिरी बंगलाच ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
कोणत्या मंत्र्यांना कोणते दालन मिळाले?
- छगन भुजबळ, मंत्रालय मुख्य इमारत, 2 रा मजला, दालन क्रमांक 201.
- दिलीप वळसे-पाटील, मंत्रालय मुख्य इमारत, 3 रा मजला, दालन क्रमांक 303.
- हसन मुश्रीफ, मंत्रालय विस्तार इमारत, 4 था मजला, क्रमांक 407.
- संजय बनसोडे, मंत्रालय मुख्य इमारत, 3 रा मजला,दालन क्रमांक 301
- अनिल पाटील, मंत्रालय मुख्य इमारत, 4 था मजला, दालन क्रमांक 401
- आदिती तटकरे, मंत्रालय मुख्य इमारत, 1 ला मजला, दालन क्रमांक 103 क्रमांकाचे दालन मिळाले.
- धनजंय मुंडे, मंत्रालय विस्तार इमारत 2 रा मजला, दालन क्रमांक 201, 204, 212 मिळाली.
- धर्मरावबाबा आत्राम, मंत्रालय विस्तार इमारत, 6 वा मजला, दालन क्रमांक 601, 602, 604 मिळाली.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.