KDMC Politics : उद्धव ठाकरेंच्या चार नगरसेवकांना डांबून ठेवले, अल्पेश भोईरांच्या आरोपाने खळबळ, पोलिसांमध्ये तक्रार...

Uddhav Thackeray Shiv Sena Councillors : डोंबिवली महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचे एकूण ११ नगरसेवक निवडून आलेले आहेत. मात्र, सात नगरसेवकांचाच गट स्थापन करण्यात आला आहे. चार जणांना डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Shiv Sena (UBT) leaders react after allegations that four party corporators were detained by political rivals.
Shiv Sena (UBT) leaders react after allegations that four party corporators were detained by political rivals.sarkarnama
Published on
Updated on

शर्मिला वाळुंज

KDMC News : कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय संघर्ष अधिक तीव्र होत असताना, अल्पेश भोईर यांनी गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. “आमचे चारही नगरसेवक आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना जबरदस्तीने डांबून ठेवण्यात आले आहे,” असा दावा भोईर यांनी केला.

कल्याण शिवसेना शाखेत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण डोंबिवली मध्ये सुरू असलेला घडामोडींवर आपले मत व्यक्त केले.

अल्पेश भोईर पुढे म्हणाले, काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सात नगरसेवकांचा गट स्थापन करण्यात आला. मात्र, कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत ठाकरे गटाचे एकूण ११ नगरसेवक निवडून आलेले आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे उर्वरित चार नगरसेवक कुठे आहेत, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

तसेच, काल मनसेचे नेते राजू पाटील यांच्या उपस्थितीत स्थापन केलेल्या गटात पाच नगरसेवकांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मनसेने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिल्याची भूमिका मांडली. मात्र, त्यांच्या वक्तव्यात शिवसेना ठाकरे गटाचे चार नगरसेवक त्यांच्या संपर्कात असल्याचा किंवा ते कुठे आहेत याचा कोणताही उल्लेख नव्हता.

यावर प्रतिक्रिया देताना अल्पेश भोईर म्हणाले की, “आमचे चारही नगरसेवक मनसे आणि शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहेत. त्यांनी आमच्याशी संपर्क साधून स्पष्ट सांगितले आहे की, मनसे, शिवसेना शिंदे गट आणि भाजपला पाठिंबा देण्याची त्यांची कोणतीही इच्छा नाही. तरीही त्यांना बाहेर येऊ दिले जात नाही आणि त्यांचा संपर्क तोडण्यात आला आहे.”

Shiv Sena (UBT) leaders react after allegations that four party corporators were detained by political rivals.
Thackeray BMC Mayor : ठाकरेंचे महापौरपद 'देवाच्या' मनात नव्हतेच.. आधी संख्याबळाने हुकलं, आता 'या' एका नियमाने केला घात

भोईर यांनी पुढे इशारा देत सांगितले की,“आजच जर हे चारही नगरसेवक जनतेसमोर आणले गेले नाहीत, तर आम्ही थेट पोलीस ठाण्यात नगरसेवक मिसिंग असल्याची तक्रार दाखल करू. लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीने डांबून ठेवणे म्हणजे थेट गुन्हा असून, ही लोकशाही मूल्यांची पायमल्ली आहे.”

या गंभीर आरोपांमुळे कल्याण–डोंबिवलीतील सत्तास्थापनेचा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता असून, प्रशासन आणि पोलिसांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shiv Sena (UBT) leaders react after allegations that four party corporators were detained by political rivals.
Mayor Reservation : महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर, पुण्यात महिलाराज तर मुंबईत..., 29 महापालिकांची संपूर्ण यादीच वाचा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com