Video Ambadas Danve : माझे निलंबन मागे घ्यावे, अंबादास दानवेंनी उपसभापतींना दिले पत्र

Maharashtra Assembly Session 2024 : आपल्यावर झालेल्या निलंबनाचा फेरविचार व्हावा अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.सभागृहातील वर्तनाबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्याकडून अनावधानाने घडलेल्या घटनेमुळे मला निलंबित करण्यात आले.
Ambadas Danve- Neelam gorhe
Ambadas Danve- Neelam gorheSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानपरिषदेमध्ये शिवीगाळ प्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर पाच दिवसांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचा फेरविचार करावा, अशी मागणी दानवे यांनी केली आहे. माझे निलंबन मागे घ्यावे, अशी विनंती करणारे पत्र दानवे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांना दिले आहे.

मुंबईत राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सभागृहात शिवीगाळ केली. हा प्रकार घडल्यानंतर सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील सदस्यांनी दानवे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मंगळवारी सभागृह सुरु होताच लावून धरली होती.

त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दानवे यांना पाच दिवस निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला.विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी हा प्रस्ताव सभागृहात वाचून दाखवित यावर मतदान घेत पाच दिवसांसाठी दानवे यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव आवाजी मतदानाद्वारे मान्य झाल्याचे जाहीर केले.

Ambadas Danve- Neelam gorhe
Sanjay Shirsat News : राजकारणापलीकडची मैत्री! काँग्रेसच्या 'त्या' आमदाराची शिंदे गटाच्या नेत्याकडून विचारपूस

विरोधी पक्षनेते दानवे यांना निलंबित करण्यात आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावर प्रतिक्रिया देताना झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. दानवे यांनी अडकविण्यासाठी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे षढयंत्र रचल्याचा आरोप देखील ठाकरे यांनी केला होता. यापूर्वी महिलांना शिवीगाळ करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी कधी माफी मागितली असा प्रश्न उपस्थित करत ठाकरे यांनी भाजपला कोंडीत पकडले होते.

Ambadas Danve- Neelam gorhe
Ambadas Danve : निलंबनानंतर अंबादास दानवे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, पाशवी बहुमताच्या...

सभागृहात झालेल्या प्रकाराची दिलगीरी व्यक्त करत आता अंबादास दानवे यांनीही एक पाऊल मागे घेतले आहे. आपल्यावर झालेल्या निलंबनाचा फेरविचार व्हावा अशी मागणी दानवे यांनी केली आहे.सभागृहातील वर्तनाबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्याकडून अनावधानाने घडलेल्या घटनेमुळे मला निलंबित करण्यात आले. आमच्या पक्षप्रमुखांनी जाहीर दिलगीरी व्यक्त केली आहे. माझे निलंबन मागे घ्यावे, अशी विनंती दानवे यांनी केली आहे.

उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांना याबाबत दानवे यांनी पत्र दिले आहे. त्यामध्ये निलंबन मागे घेण्याची विनंती करण्यात आली आहे. यावर काही वेळापूर्वी डॉ. निलम गोऱ्हे यांच्या दालनात बैठक पार पडली. त्यामध्ये सत्ताधारी पक्षाने आम्ही आमचा निर्णय सभागृहात जाहीर करू, अशी भूमिका मांडली असल्याचे समजते. त्यामुळे आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर झालेली निलंबनाची कारवाई मागे घेतली जाणार की नाही, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांना दिलेल्या पत्रात काय म्हंटलं आहे...

Ambadas Danve letter
Ambadas Danve letterSarkarnama

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com