Ambarnath Accident News : निवडणुकीचा प्रचार संपवून परत निघालेल्या एकनाथ शिंदेंच्या अंबरनाथ नगरपरिषदेच्या महिला उमेदवार किरण चौबे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांना मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अंबरनाथ उड्डापूलावर घडलेल्या हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
किरण चौबे या बुवापाडा प्रभागातून निवडणूक लढत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्या प्रचार संपवून कारने परत जात होत्या. मात्र, अंबरनाथ उड्डानपूलावर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने तीन ते चार दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये अंबरनाथ महापालिकेचे दोन कर्मचारी शैलश जाधव आणि चंद्रकांत अनर्थे तसेच कारचालक लक्ष्मण शिंदे यांच्यासह पादचारी सुमित चेलानी यांचाही या अपघातामध्ये मृत्यू झाला.
काही मीडिया रिपोर्टनुसार कारचा चालक लक्ष्मण शिंदे याला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले त्यामुळे हा भीषण अपघात घडला. दरम्यान, या अपघाताचा अधिक तपास अंबरनाथ तपास करीत आहेत.
अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे. त्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की वेगाने येणाऱ्या कारने समोरच्या तीन ते चार दुचाकांनी जोरदात धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की कार जाग्यावर पलटी झाली तर एक जण उड्डानपूलावरून खाली पडताना दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.