Amit Shah In Mumbai : अमित शहांना तब्बल एक तास उशीर; मात्र मुंबईत दाखल होताच घडवले माणुसकीचे दर्शन !

BJP News : भाजप नेत्याच्या घरी जात, सात्वंन केले...
Amit Shah In Mumbai : BJP News :
Amit Shah In Mumbai : BJP News :Sarkarnama
Published on
Updated on

Amit Shah Mumbai Tour : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचा मुंबई दौरा आज आणि उद्या नियोजित आहे. सह्याद्री अथितीगृहावर अमित शाह यांचा राज्यातील भाजप नेत्यासोबत बैठक पार पडणार आहे. तसेच, महाराष्ट्र भूषण वितरण सोहळ्याला देखील अमित शाह उपस्थित राहणार आहेत, असे असले तरी आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूकीच्या दृष्टीकोनातून शाह यांच्या दौऱ्यावर पाहिले जाते. मात्र मुंबईत आल्यानंतर त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले.

Amit Shah In Mumbai : BJP News :
Pune News : दोन गटाचा पोलीस ठाण्यातच राडा; भाजपच्या माजी नगरसेवकासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अमित शाह यांचं विमान आजच सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी मुंबई विमानतळावर उतरणार होतं. मात्र अमित शाह यांना तब्बल एक तास विलंब झाला. शाह थेट रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान मुंबईत दाखल झाले. शाह यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच भाजपचे महत्त्वपूर्ण नेते मुंबई विमानळाकडे रवाना झाले होते. या सगळ्या घडामोडी दरम्यान अमित शाह यांनी माणुसकीचे दर्शन घडवणारी कृती केली.

Amit Shah In Mumbai : BJP News :
Amit Shaha In Mumbai : अमित शहा मुंबईत दाखल; महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन!

अमित शाह यांनी तावडे कुटुंबाची सात्वनपर भेट घेतली :

अमित शाह यांच्या दौऱ्याला एक तास विलंब झाला असला तरी, त्यांनी सर्वप्रथम भाजप नेते विनोद तावडे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. विनोद तावडे सद्यस्थितीत भाजप कार्यकारणीत सक्रियपणे कार्यरत आहेत. मागील दोन दिवसांपूर्वी विनोद तावडे यांच्यावर दु:खाचा आघात झाला होता. तावडे यांच्या मातोश्रींचं निधन झालं होतं.

त्यामुळे अमित शाह मुंबईत दाखल होताच, विनोद तावडे यांच्या निवासस्थानी गेले. त्यांनी तावडे कुटुंबियांची सांत्वन केले. यानंतर अमित शाह सह्याद्री अतिथीगृहाच्या दिशेने रवाना झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com