Mahayuti local elections : स्थानिक निवडणुकांत महायुतीमध्ये अंतर्गत संग्राम! तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांची कोंडी अटळ!

Mahayuti internal conflict News : निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे कार्यकर्त्यांची संख्या मोठी असणार आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
Mahayuti's Leader
Mahayuti's LeaderSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाना न्यायालयाच्या आदेशामुळे मुहूर्त लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीची तयारी करीत असलेल्या कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण आहे. दुसरीकडे महायुतीमधील तीन घटक पक्ष आगामी काळात होत असली ही निवडणूक युती करून लढविणार की स्वबळावर लढणार यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.

मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी महायुती एकत्रित निवडणूक लढणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. तर काही ठिकाणी महायुती झाली नाही तर निवडणुकांनंतर युती करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तरी पण स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे कार्यकर्त्यांची संख्या मोठी असणार आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना राज्याच्या राजकीय पटावर मोठी हालचाल दिसून येत आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत महायुतीतील कार्यकर्त्यांसाठी ही तयारी केवळ मैदानात उतरण्यापुरती मर्यादित नाही, तर उमेदवारी मिळवण्यासाठीच मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे महायुतीमधील भाजप (BJP), शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीनही पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले असून महायुतीमध्ये उमेदवारी मिळण्यासाठी मात्र कार्यकर्त्यांना कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठी रस्सीखेच असणार आहे.

Mahayuti's Leader
Maratha reservation : मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अवघ्या 24 तासांतच अंमलबजावणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमधील शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी आणि भाजपसह घटक पक्ष एकत्र लढणार असल्याचे जवळपास ठरले असले तरी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायती, नगरपालिका, महानगर पालिका, सोसायट्या आदीसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्था या कार्यकर्त्या घडवणाऱ्या संस्था आहेत. येथे निवडून आलेले बहुतांश नेते पुढे आमदार, खासदार, मंत्री व राज्याच्या व जिल्ह्याच्या राजकारणातील प्रमुख नेते झालेले आहेत.

Mahayuti's Leader
Martha Reservation : मराठा आरक्षणासाठी आमदाराने मध्यरात्री केली 'या' नेत्याची कानउघडणी!

त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना अॅडजस्ट करण्यासह संधी देणाऱ्या या संस्थांच्या पाच वर्षापासून निवडणूकांच नाहीत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायती, नगरपालिका, महानगर पालिका, सोसायट्यावर निवडून जाण्यासाठी आता कार्यकर्त्यांना जोर लावावा लागणार आहे.

प्रत्येक ठिकाणी महायुतीमधील तीनही पक्षांचे कार्यकर्ते उमेदवारीसाठी इच्छुक असणार आहेत. जागांच्या वाटाघाटीत काही ठिकाणी नाराजी वाढु शकते. पण गेल्या अनेक वर्षापासून निवडणूक लढवण्याची तयारी करत असलेल्यांना मात्र उमेदवारी मिळण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

Mahayuti's Leader
Eknath Shinde : ठाण्यात दोन मंत्र्यांतील संघर्ष शिगेला; एकनाथ शिंदेंनी खडसावले; म्हणाले, 'लोकांच्या जीवापेक्षा तुम्ही मोठे नाहीत..'

महायुतीमध्ये असणार रस्सीखेच

महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) असे तीन प्रमुख पक्ष आहेत. यामध्ये प्रत्येक पक्षाच्या आकांक्षांपेक्षा जागा मर्यादित असतील, हे उघड आहे. एकाच मतदारसंघात अनेक इच्छुक असताना, उमेदवारीसाठी होणारी चुरस ही केवळ पक्षांतर्गत न राहता आता युतीतील गटांमध्येही निर्माण झाली आहे. जागावाटपातील ही तडजोड कार्यकर्त्यांसाठी संभ्रम निर्माण करणारी ठरत आहे. त्यामुळे एका जागेसाठी इच्छुकांची संख्या मोठी असणार आहे.

Mahayuti's Leader
NCP merger news : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता ठरली पेल्यातील वादळ; असा फुटला चर्चेचा फुगा !

बंडखोरी, अपक्षांची चिंता

स्थानिकच्या निवडणुकीत ज्या मतदारसंघात एका पक्षाची मजबूत संघटना आहे, तिथे जर उमेदवारी दुसऱ्या घटक पक्षाला दिली गेली, तर स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येणार आहे. ज्यांना तिकीट मिळणार नाही, ते अपक्ष म्हणून उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे अधिकृत उमेदवाराची गणित कोलमडणार आहे. महायुतीमध्ये भाजप, शिंदे गट (शिवसेना), आणि अजित पवार गट (राष्ट्रवादी) असे प्रमुख घटक आहेत. त्यामुळे एकाच मतदारसंघासाठी तीन वेगवेगळ्या पक्षांचे इच्छुक उमेदवार असू शकतात. त्यामुळे तिकीट वाटप करताना तडजोड करावी लागणार आहे.

Mahayuti's Leader
Neelam Gorhe On Supriya Sule : नीलम गोऱ्हेंची 'NCP' एकत्र येण्यावर सुळेंना सूचक 'मेसेज'; 'स्थानिक'मध्ये महायुतीचा निर्णय एकनाथ शिंदे घेणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com