Mumbai News: गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला असून मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची लवकरच रणधुमाळी सुरू होणार आहे. येत्या 10 सप्टेंबरला मुंबईच्या विद्यापीठाची सिनेट निवडणूक पार पडणार असून 13 सप्टेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या सिनेट निवडणुकी संदर्भातील निवडणूक अधिसूचना बुधवारी मुंबई विद्यापीठाने जारी केली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट असून उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया 21 ऑगस्टपर्यंत असणार आहे. याबरोबरच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 25 ऑगस्ट आहे, तर 28 ऑगस्टला उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
तसेच 10 सप्टेंबरला सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सिनेट निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. त्यानंतर 13 सप्टेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक दहा जागांसाठी असून या दहा जागांपैकी पाच जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत. तर पाच जागा या राखीव प्रवर्गासाठी आरक्षित आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.