Amol Kirtikar News : ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकरांना ईडीची दुसरी नोटीस; चौकशीसाठी बोलावले...

Lok Sabha Election 2024 : ऐन लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत अमोल कीर्तिकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
Amol Kirtikar News
Amol Kirtikar News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेले अमोल कीर्तिकर यांना ईडीने पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीकडून कीर्तिकर यांना दुसरी नोटीस पाठवण्यात आली आहे. 8 एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे त्यांना आदेश देण्यात आले आहेत. खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल कीर्तिकर यांना समन्स बजावण्यात आले आहे. ऐन लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत अमोल कीर्तिकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. (Latest Marathi News)

Amol Kirtikar News
Kolhapur NCP : 'बडा घर, पोकळ वासा!'; कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या स्थितीला जबाबदार कोण?

कोण आहेत अमोल कीर्तिकर?

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या (UBT) वतीने त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषित केले आहे. अमोल कीर्तिकर यांचे वडील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर आहेत. गजानन कीर्तिकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत कार्यरत आहेत. सध्या मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून ते विद्यमान खासदार आहेत. या ठिकाणी अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटात झालेले अभिनेते गोविंदा किंवा राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा हे उमेदवारअसू शकतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amol Kirtikar News
Dindori Lok Sabha Election: भाजप-माकपचे नेते शरद पवारांची 'तुतारी' हाती घेणार?

काय आहे 'खिचडी घोटाळा'?

'खिचडी' घोटाळा कोविडच्या (2019) कालावधीत स्थलांतरित कामगारांना 'खिचडी' वाटण्याचे कंत्राट वितरणाच्या अनियमतताबाबत आहे. सप्टेंबर 2023 मध्ये, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने खिचडी कंत्राट वितरणाशी संबंधित 6.37 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यामध्ये अमोल कीर्तिकरसह आणखी काही जणांवर एफआयआर दाखल केला गेला आहे.

Amol Kirtikar News
Nanded BJP News : अशोक चव्हाणांकडून प्रचार लोकसभेचा अन् तयारी मुलीला आमदार करण्याची...

बेकायदेशीर कंत्राट -

ऑक्टोबर 2023 मध्ये ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्यांतर्गत (पीएमएलए) मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय सहकारी सूरज चव्हाण यांना अटक केली. चव्हाण यांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली होती. चव्हाण यांच्यावर नियम -निकषांना डावलून मेसर्स फोर्स वन मल्टी सर्व्हिसेससाठी बेकायदेशीरपणे वर्क ऑर्डर मिळवून दिल्याचा आरोप आहे.

Amol Kirtikar News
Kolhapur NCP : 'बडा घर, पोकळ वासा!'; कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या स्थितीला जबाबदार कोण?

काँग्रेस नेत्याची नाराजी -

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अमोल कीर्तिकर यांची जाहीर सभेतून उमेदवारी जाहीर केली होती. यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी दिसून आली. उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये नाराजी होती, कारण काँग्रेस नेते संजय निरुपम यांना या जागेवरून निवडणूक लढवायची होती. उद्धव ठाकरेंच्या निर्णयानंतर निरुपम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com