Thane Political News : सुनेत्राताई पवार यांचे योगदान विचारता, तर २०१४मध्ये श्रीकांत शिंदे यांचे योगदान काय होते असे कल्याणच्या मतदारांनी म्हणायचे का? असा सवाल मुख्यमंत्री शिंदेंना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी विचारला आहे.
याशिवाय 'मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निष्ठावान आहे, असे वक्तव्य विजय शिवतारे(Vijay Shivatare) यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुकदर्शक न बनता आता स्पष्टीकरण देण्याची गरज आहे की निष्ठेची व्याख्या काय? बारामतीत पवार विरुद्ध पवार नको, पवारांना मतदान करु नका, सुनेत्राताई पवार यांचे सामाजिक कार्य काय आहे? असा प्रश्न विचारला जातोय.
तर मग 2014 मध्ये कल्याणच्या जनतेने असा प्रश्न विचारला पाहिजे होता की श्रीकांत शिंदे यांचे काय योगदान होते? त्यांना मतदान करताना कल्याणच्या जनतेने असे म्हणायचे का? असा प्रकारचा प्रश्न देखील ठाण्यातील जनता विचारु शकते.'
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यामुळे शिवसेनेचे मुख्यनेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगावे की शिवराळ विजय शिवतारे यांच्याविरोधात ते कोणती कारवाई करणार आहेत? असा जाहीर सवाल ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे(Anand Paranjape) यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
याशिवाय परांजपे म्हणाले, 'शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातुन अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याविरोधात शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा अनेक आरोप केले. तसेच आमचे श्रद्धास्थान शरदचंद्र पवार यांच्यावर देखील अनेक आरोप केले.
एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी सन्मान करतो आणि त्याही पलिकडे जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मी निष्ठावान आहे, असे वक्तव्य विजय शिवतारे यांनी केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. की, निष्ठेची व्याख्या काय?'
याचबरोबर 'महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आम्ही दोन्ही पक्षांनी अत्यंत संयम आणि मर्यादा बाळगलेली आहे. पण गेले दोन दिवसांपासून शिवसेनेचे शिवराळ विजय शिवतारे हे राष्ट्रवादी नेत्यांचा अपमान करत आहेत. राष्ट्रवादीच्या शक्तिस्थळावर आघात करीत आहेत आणि मुख्यमंत्री हे मुकदर्शक बनलेले आहेत. त्यांना समज देखील देण्यात आलेली आहे की नाही हे सुद्धआ महाराष्ट्राला माहीत नाही.
म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगावे विजय शिवतारे यांच्याविरोधात कोणती कारवाई करणार? कारण मी मुख्यमंत्र्यांचा निष्ठावान पण मी महायुतीतील घटक पक्षांच्या विरोधात निवडणूक लढविणार ,अशाप्रकारची भूमिका असू शकत नाही. स्पष्टीकरण देण्याची गरज आहे.' असे परांजपे यांनी म्हटले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.