
CBI Raid In Pune: पुणे विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांच्याभोवतीचा फास दिवसेंदिवस अधिक आवळला जात असल्याचं दिसत आहे. याचं कारण म्हणजे सीबीआयने आता रामोड यांनी केलेल्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (NHI) प्रकल्पांमधील भूसंपादन मोबदल्यांच्या प्रकरणांमध्ये दिलेल्या निकालांची चौकशी सुरू केली आहे.
सीबीआयने रामोड यांनी भूसंपादनाच्या प्रकरणांत आतापर्यंत दिलेल्या निकालांबाबत चौकशी सुरू केली आहे.भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातील भूसंपादनातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्याच्या प्रकरणांवर लवाद म्हणून आयुक्त रामोड सुनावण्या घेत होते. कारवाई होण्यापूर्वी रामोड यांनी वढू बुद्रुक येथील एका वादग्रस्त जमिनीच्या प्रकरणात निकाल दिला होता. (Anil Ramod CBI News)
या प्रकरणी सीबीआयला मिळालेल्या तक्रारींनुसार अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी सीबीआयने शिरूरच्या तहसीलदारांना पत्र पाठवून संबंधित जमिनीच्या कागदपत्रांची मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. (Ramod CBI Case)
नेमके प्रकरण काय ?
वढू बुद्रुक येथील वक्फ मंडळाची १९ एकर (वर्ग-दोन ) इनामी जमीन सन १८६२ ची सनद आहे. पण हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही रामोड यांनी ही जमीन खासगी लोकांच्या नावाने करुन दिल्याचा आरोप वक्फ बोर्डाच्या वतीने केला आहे. पदाचा गैरवापर करत थेट खासगी लोकांच्या नावाने ही जमीन देण्याचे आदेश देत जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप वक्फ बोर्डाने केला आहे.या प्रकरणाचा तपास करण्यात यावा, अशी मागणी वक्फ बोर्डाने प्रशासनाकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर सीबीआयने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.(Pune CBI Enquiry Case)
इतकेच नव्हे तर, रामोड यांच्यावर झालेल्या कारवाईने महसूल अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. रामोड यांनी दिलेल्या निकालांची तपासणी होणार असल्याने रामोड यांना या व्यवहारामंध्ये कोणी कोणी मदत केली. कसे व्यवहार करण्यात आले, हे व्यवहार करताना कोणाचे हात ओले झाले, या सर्वांची सीबीआय कडून चौकशी करण्यात येणार आहे. यामुळे महसूल विभागातील इतर अधिकारी , कर्मचाऱ्यांमध्येही अस्वस्थता वाढली आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.