Anjali Damania: कबूतरखाना वादात अंजली दमानियांची एन्ट्री; केली 'ही' मोठी मागणी

Anjali Damania Speaks on Kabutarkhana: आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होत असल्यानं मुंबई हायकोर्टानं मुंबईतील सर्व कबूतरखाने हटवण्याचे आदेश दिले आहेत.
Anjali Damania
Anjali Damania
Published on
Updated on

Anjali Damania Speaks on Kabutarkhana: दादर येथील कबूतरखाना हटवण्यावरुन निर्माण झालेला वाद आता चिघळला आहे. एकीकडं कोर्टाचे हटवण्याचे आदेश आहेत तर दुसरीकडं जैन समाज न हटवण्यावर ठाम आहे. या वादात आता समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची एन्ट्री झाली आहे. याप्रकरणावर भाष्य करताना त्यांनी जैन समाजाकडं मोठी मागणी केली आहे.

Anjali Damania
DGIPR : देशभक्त दोन प्रकारचे असतात, तुम्ही कोणत्या प्रकारात येता?; असा प्रश्न विचारणारी सरकारी प्रचार यंत्रणा झाली ट्रोल

दमानिया काय म्हणाल्या?

कबूतरखान्याच्या वादावर अंजली दमानिया म्हणाल्या, "जैन समाजातील चेस्ट फिजिशियन डॉक्टर्सनं आपल्या समाजाला समजावण्याचा प्रयत्न करावा. हे जर सरकारकडून घडवण्यात आलं तर अतिउत्तम होईल. कबुतरांच्या विष्ठेमुळं बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शन रेस्पिरेटी डिसॉर्डर हे आजार होतात. हे जर त्यांच्या समाजाच्या डॉक्टरनंज जैन मुनींना समजावलं तर बरं होईल. उगाच वाद निर्माण करण्यात काहीही फायदा नाही. सध्याच्या घडीला या सगळ्या गोष्टी जैन समाजाला समजावल्या पाहिजेत. काही प्रथा रूढी या जर माणसाच्या जीवाला घातक ठरत असतील तर त्या थांबवायला हव्यात, ही समज त्यांना जर व्यवस्थितपणे दिली तर हा वाद नक्कीच मिटेल"

Anjali Damania
Pratap Sarnaik News: 'रक्षाबंधन'मुळे एसटी महामंडळाचं नशीब फळफळलं; 4 दिवसांतच भाऊ-बहिणींनी टाकली कोट्यवधींची ओवाळणी

वाद नेमका काय?

दरम्यान, आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होत असल्यानं मुंबई हायकोर्टानं मुंबईतील सर्व कबूतरखाने हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, मुंबई महापालिकेनं दादर इथल्या कबूतरखान्याचं स्ट्रक्चर काढण्यास सुरुवात करण्यात आली होती. पण याला स्थानिक जैन समाजाच्या लोकांनी विरोध केला आहे. कबूतरांना दाणे टाकणं हा आमचा धार्मिक विषय असल्याचं या समाजाच्या लोकांचं म्हणण आहे.

Anjali Damania
भास्कर जाधवांचे रामदास कदमांवर गंभीर आरोप? तरिही योगेश कदम म्हणतात, 'त्यांच्यावर माझा विश्वास...' नेमकं काय घडतयं तळ कोकणात?

जैन समाज आक्रमक

कोर्टाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेनं दादरसह मुंबईतील कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कबुतरखान्याच्या बांधकामावर ताडपत्री टाकून तो झाकून टाकण्यात आला. पण जैन समाजानं या ताडपत्रीची हटवली आणि तो पुन्हा खुला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी या प्रश्नावर भाष्य करताना प्रक्षोभक विधान केलं आणि नंतर मागेही घेतलं. "आम्ही भारताचं संविधान आणि कोर्टाला मानतो. देवेंद्र फडणवीस यांनाही मानतो, पण आमच्या धर्माच्या विरोधात काही आलं तर आम्ही कोर्टालाही मानणार नाही" असं विधान त्यांनी केलं. त्यामुळं त्यांना मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं. अद्यापही हा वाद पूर्णपणे मिटलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com