राज्य सरकारला दणका; OBC आरक्षणाशिवाय ९२ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर

OBC Reservation | इच्छुकांना निवडणुकीसाठी जेमतेम १ महिन्याचा कालावधी...
Election voting
Election votingSarkarnama 
Published on
Updated on

मुंबई : राज्य सरकारला (Maharashtra Government) मोठा दणका बसला असून ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) १७ जिल्ह्यांमधील तब्बल ९२ नगरपालिका आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. पर्जन्यमान कमी असलेल्या १७ जिल्ह्यांमधील ९२ नगरपालिका व ४ नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहिर केला. या निवडणुकीची प्रक्रिया २० जुलैपासून सुरु होणार असून १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी करुन निकाल जाहीर केले जाणार आहेत.

राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऐन पावसाळ्यात घेता येणे शक्य नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून (Election Commission) सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले होते. तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये दोन टप्प्यात या निवडणुका घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आयोगाकडून न्यायालयात करण्यात आली होता. मात्र यावर राज्यात ज्या भागात पाऊस नाही, तिथे निवडणुका घेण्यास काय हरकत आहे, असा प्रश्न न्यायालयाने आयोगाला केला होता. त्यानुसार आता आयोगाकडून जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणूक कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, या निवडणुकीची प्रक्रिया २० जुलैपासून सुरु होणार आहे. २० जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार असून लगेच २२ ते २८ जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. छाननी व वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी २९ जुलै रोजी जाहिर केली जाणार असून ४ ऑगस्ट पर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.

यानंतर जिथे आवश्यकता भासेल तिथे १८ जुलै रोजी मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे यंदा अर्ज माघारी घेतल्यापासून प्रत्यक्ष मतदानापर्यंत १४ दिवसांचा कालावधी असून प्रचारासाठी उमेदवारांना २ आठवड्यांचा कालावधी मिळणार आहे. यंदा प्रथमच संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबचा उल्लेख निवडणूक आयोगाने केला असून ती एक नवीन बाब ठरणार आहे.

या ठिकाणी होणार आहेत निवडणुका...

अ वर्गातील ६ नगरपरिषदा -

  • भुसावळ

  • बारामती

  • बार्शी

  • जालना

  • बीड

  • उस्मानाबाद

ब वर्गातील २८ नगरपरिषदा -

  • मनमाड

  • सिन्नर

  • येवला

  • दौंडाईचा- वरवाडे

  • शिरपूर- वरवाडे

  • शहादा

  • अंमळनेर

  • चाळीसगाव

  • कोपरगाव

  • संगमनेर

  • श्रीरामपूर

  • चाकण

  • दौंड

  • कराड

  • फलटण

  • इस्लामपूर

  • विटा

  • अक्कलकोट

  • पंढरपूर

  • अकलूज

  • जयसिंगपूर

  • कन्नड

  • पैठण

  • अंबेजोगाई

  • माजलगाव

  • परळी-वैजनाथ

  • अहमदपूर

  • अंजनगाव- सुर्जी

क वर्गातील नगरपरिषदा -

  • कुरुंदवाड

  • मुरगुड

  • वडगांव

  • गंगापूर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com