Mumbai APMC : मुंबई बाजार समितीचे संचालक मंडळ तडकाफडकी बरखास्त; मंत्री जयकुमार रावल 'बॉस'!

Mumbai APMC : 1977 मध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) ची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल ती 49 वर्ष अस्तित्वात आहे. मात्र, ही व्यवस्था रद्द करत संचालक मंडळ बरखस्त करण्यात आले.
Mumbai APMC board dismissed
Mumbai APMC board dismissedSarkarnama
Published on
Updated on

Mumbai APMC latest news: नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे (एपीएमसी) संचालक मंडळ अधिकृतपणे बरखास्त करण्यात आले असून, या बाजार समितीचे रूपांतर आता एका व्यापक ‘राष्ट्रीय बाजार समिती’मध्ये झाले आहे. या पुनर्रचित राष्ट्रीय बाजार समितीच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

रावल यांनी नवी मुंबईतील वाशी येथील एपीएमसी मुख्य कार्यालयात कार्यभार स्वीकारला. या प्रशासकीय परिवर्तन अंमलबजावणीसाठी पणन संचालक विकास रसाळ यांनी तात्पुरते प्रशासक म्हणून यापूर्वीच कारभार हाती घेतला होता.

1977 मध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) ची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल ती 49 वर्ष अस्तित्वात आहे. मात्र, ही व्यवस्था रद्द करत संचालक मंडळ बरखस्त करण्यात आले. आता पणनमंत्र्यांकडे अध्यक्षपद असणार आहे.

नव्या नियमानुसार पूर्वीच्या १२ शेतकरी प्रतिनिधींच्या जागी केवळ चार शेतकरी प्रतिनिधी असणार आहेत. ते बाजार समितीच्या क्षेत्रातील असणे बंधनकरक असणार आहे. व्यापारी प्रतिनिधींची संख्या देखील कमी झाली असून पाच वरून ही संख्या तीन झाली आहे. तर, कामगारांच्या प्रतिनिधींना या रचनेत स्थान देण्यात आलेले नाही. कामगार प्रतिनिधींचे स्थान पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे.

Mumbai APMC board dismissed
Sanjay Raut Shiv Sena UBT : नवहिंदुत्ववादी कसे जिंकतात, जनतेला सगळं माहिती; खासदार राऊतांचा आमदार जगतापांचा टोला

कशी असेल नवीन रचना?

नव्या रचनेनुसार पणनमंत्री हे राष्ट्रीय बाजार समितीच्या अध्यक्षपदी असतील. तर, पणन राज्यमंत्री, कृषी आयुक्त, पणन संचालक, कार्यकारी संचालक हे संचालक मंडळात असणार आहेत.

संचालक मंडळात शेतकरी प्रतिनिधी चार, इतर राज्यांतील दोन प्रतिनिधी, व्यापारी प्रतिनिधी तीन, आयात-निर्यात क्षेत्रातील तज्ज्ञ, एपीडा, वखार महामंडळ यांना देखील संचालकमंडळात स्थान असणार आहेत. सचिव हे प्रशासकीय कामकाजाचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.

Mumbai APMC board dismissed
Kolhapur market committee case: मंत्री मुश्रीफ, आमदार सतेज पाटील गटाच्या संचालकांना आपात्रतेची नोटीस; 'हे' प्रकरण भोवणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com