Mumbai APMC : राज्याच्या पणन संचालकांचा प्रताप; स्वतःच आदेश काढत मुंबई बाजार समिती घेतली ताब्यात

Vikas Rasal Controversy : राज्याचे पणन संचालक विकास रसाळ यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे तात्पुरते प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला आहे. बाजार समिती (APMC) च्या निवडून आलेल्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी हा पदभार स्वीकारला.
APMC Mumbai
Vikas Rasal assumed charge as the temporary administrator of APMC Mumbai after the board’s tenure ended, but his self-issued appointment order stirred controversySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 05 Sep : राज्याचे पणन संचालक विकास रसाळ यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे तात्पुरते प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला आहे. बाजार समिती (APMC) च्या निवडून आलेल्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी हा पदभार स्वीकारला.

मात्र, रसाळ यांनी स्वतःच्या नियुक्तीचा आदेश स्वतःच काढल्याचा विचित्र प्रकार आता समोर आला आहे. त्यांच्या या प्रतापावर मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शिवाय अशा प्रकारे स्वतःची नियुक्ती स्वतः करणे हे कायदेशीर निकषांना धरून नसल्यामुळे त्यांना विभागीय चौकशीचा सामना करावा लागण्याची शक्यता मंत्रालयातील ज्येष्ठ अधिकाऱ्याने वर्तवली आहे.

गेल्या वर्षीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या सदस्यांनी मुदतवाढीसाठी प्रयत्न केले होते. मात्र, ऑगस्ट 2025 अखेर या संचालक मंडळाची मुदत संपल्यामुळे संचालकांची सर्व पदे रिक्त झाली आहेत.

APMC Mumbai
Anjali Damania Video : 'अजित पवार प्रत्येकाला शहानपणा शिकवता, अंजली कृष्णनवर कारवाई झाली तर...', अंजली दमानिया प्रचंड संतापल्या

त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक होऊन प्रत्यक्षात संचालक मंडळ कार्यरत होईपर्यंत किंवा या आदेशाच्या दिनांकापासून 6 महिन्यांपर्यंत बाजार समितीचे दैनंदिन व प्रशासकीय कामकाज पार पाडण्यासाठी रसाळ हे प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत. मात्र, त्यांनी ही नियुक्ती स्वत:च केल्यामुळे आता नवा वाद सुरू झाला आहे.

APMC Mumbai
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलनाला एकनाथ शिंदेंची ताकद? फडणवीसांना घेरायचा प्लॅन होता? जरांगेंनी पहिल्यांदाच दिलं उत्तर

तर पणनमंत्री जयकुमार रावल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मी ‘एपीएमसी’ची जबाबदारी स्वीकारणार आहे. मुंबई एपीएमसी आणि इतर काही बाजारपेठांना राष्ट्रीय बाजारपेठ म्हणून घोषित करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं रसाळ यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com