एनसीबीच्या कार्यालयासमोरच आर्यनचा मित्र अरबाझ वडिलांवर संतापला अन्...

क्रूझ पार्टी प्रकरणी आर्यन खानसह त्याचा मित्र अरबाझ मर्चंट याला उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे.
Arbaaz and Aslam Merchant
Arbaaz and Aslam MerchantSarkarnama

मुंबई : क्रूझ पार्टी (Cruise Party) प्रकरणी आर्यन खानसह (Aryan Khan) त्याचा मित्र अरबाझ मर्चंट (Arbaaz Merchant) याला उच्च न्यायालयाने (High Court) जामीन दिला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अरबाझला दर आठवड्याला अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या (NCB) कार्यालयात हजेरी लावावी लागत आहे. या वेळी एनसीबीच्या कार्यालयासमोर तो त्याच्या वडिलांवरच भडकला.

अरबाझ मर्चंट हा हजेरी लावण्यासाठी आला, त्यावेळी त्याच्यासोबत वडील अस्लम मर्चंट हेसुद्धा होते. एनसीबीच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर अस्लम मर्चंट यांनी छायात्रिकारांना पोझ दिली. ते अरबाझ यालाही पोझ देण्यासाठी ओढू लागली. त्यावेळी अरबाझ राग अनावर झाला आणि तो वडिलांवर भडकला. त्याने दोन्ही हातांनी स्वत:चा चेहरा झाकला आणि तो म्हणाला, स्टॉप इट डॅड!

आर्यन, मुनमुन आणि अरबाझ यांच्या जामिनाच्या उच्च न्यायालयाच्या आदेशात एनसीबीकडे कोणतेही पुरावे नसल्याची बाब अधोरेखित करण्यात आली आहे. आदेशात म्हटले आहे की, आर्यन, अरबाझ आणि मुनमुन यांच्या विरोधात त्यांनी अमली पदार्थांसाठी कट आखल्याचे कोणेतेही पुरावे नाहीत. याचबरोबर त्यांच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्येही काही आक्षेपार्ह आढळलेले नाही. या आरोपींनी समान हेतू ठेवून बेकायदा कृत्य केल्याचा एकही पुरावा न्यायालयासमोर आलेला नाही. ते तिघे एका क्रूझमधून प्रवास करीत होते म्हणून त्यांना कटाचा भाग ठरवणे शक्य नाही. तसेच, तिघांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली नव्हती. त्यामुळे संबंधित वेळी त्यांनी अमली पदार्थांचे सेवन केले होते हेसुद्धा स्पष्ट होत नाही.

Arbaaz and Aslam Merchant
एका सेल्फीमुळे जॅकलिन अडकणार ईडीच्या जाळ्यात

एनसीबीने आर्यनला 3 ऑक्टोबरला पकडले होते. तो 8 ऑक्टोबरपासून आर्थर रोड कारागृहात होता. आर्यनसह तिघांच्या जामिनावर तीन दिवस उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. आर्यनच्या वतीने माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. रोहतगी हे आर्यनची बाजू मांडणार असल्याचे सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर तीन दिवसांच्या सुनावणीनंतर आर्यनसह तिघांना जामीन मिळाला आहे. अखेर 30 ऑक्टोबरला आर्यनची कारागृहातून सुटका झाली होती. मुनमुन आणि अरबाझ यांची 31 ऑक्टोबरला कारागृहातून सुटका झाली होती.

Arbaaz and Aslam Merchant
केंद्राविरोधात राज्यपाल उभे राहिले अन् म्हणाले, आजच्या आज राजीनामा देतो!

उच्च न्यायालयात सलग तीन दिवस आर्यनसह तिघांच्या जामिनावर सुनावणी सुरू होती. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन सांबरे यांनी आर्यन, मुनमुन आणि अरबाझ या तिघांना 28 ऑक्टोबरला जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयाचा जामिनाचा आदेश मिळाल्यानंतर तिघांची कारागृहातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. आर्यन आणि अरबाझ हे आर्थर रोड कारागृहात तर मुनमुन भायखळा महिला कारागृहात होता. न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर 2 दिवसांनी आर्यनची तर मुनमुन आणि अरबाझची 3 दिवसांनी सुटका झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com