
उद्धव ठाकरे यांच्यावरील आरोपाच्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी अनिल परबांवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले.
परब यांच्या नार्को टेस्टची मागणी करत बिल्डरांकडून घेतलेल्या पैशांचा खुलासा व्हावा, असे कदम म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या ठशांबाबतचा वाद पुन्हा पेटला असून, कदमांनी स्वतःची व उद्धव ठाकरेंचीही नार्को टेस्ट व्हावी, अशी मागणी केली.
Mumbai, 05 October : शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपाला आमदार अनिल परब यांनी सडेतोड उत्तर दिले. रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांनी जाळून घेतले की जाळण्याचा प्रयत्न झाला, असा सवाल केला होता. त्यामुळे चिडलेल्या रामदास कदमांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन अनिल परबांवर हल्ला करत त्यांचा इतिहासच मांडला आणि अख्ख्या मंत्रिमंडळामध्ये तुला फक्त योगेश कदमांच्याच फायली मिळतात का रे? असा सवालही केला.
रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत मी आरोप केलेले नाहीत, तर संशय व्यक्त केला आहे. आता मी अनिल परबच्या विरोधात कोर्टात जाणार आहे. तू नार्को टेस्टचं काय सांगतोय, आता पहिल्यांदा अनिल परबची नार्को टेस्ट केली पाहिजे. बिल्डरकडून त्याने मर्सिडिज घेतल्या की नाहीत? प्रेम नगरच्या एसआरएच्या योजनेत कोट्यवधी रुपये घेतले की नाही? विर्लेपार्ल्यातील एसआरए योजनेत तब्बल आठ हजार लोकांना दम दिला होता, त्यासाठी या दलालाची नार्को टेस्ट झाली पाहिजे.
आता मी हे प्रकरण काढलं आहे. ही फाईल माझ्याकडे आहे. आता मी हे बोलणार आहे. अख्ख्या मंत्रिमंडळामध्ये तुला फक्त योगेश कदमच्याच फायली मिळतात का रे? याचा अर्थ लोकांना समजत नाही का? सगळं कळतंय. मराठी माणसाला मुंबईतून बाहेर काढायला अनिल परबने (Anil Parab) बिल्डरांकडून किती पैसे घेतले, याची नार्को टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आहे.
ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याऐवजी अनिल परब हा येऊन खोटं का बोलतोय, याची नार्को टेस्ट झाली पाहिजे. मेलेल्या माणसाचे ठसे घेऊन काय उपयोग असतो, असं परब याने म्हटलं आहे. ते तुला माहिती, ते मी कसं सांगू?
मी पुन्हा शपथेवर सांगतो, मी म्हटलं उद्धवसाहेब आपण बाळसाहेब ठाकरे यांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवले पाहिजेत. ते आम्हाला पूजनीय आहेत. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले होते की, नाही रामदासभाई, मी त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवले आहेत. हे उद्धव ठाकरेंचे शब्द आहेत, त्यामुळे माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट व्हावी, असं म्हटलं आहे, असेही कदम यांनी स्पष्ट केले.
रामदास कदम म्हणाले, गधड्या, खोटारड्या, भाडखाऊ, त्यावेळी तू तिथे नव्हता. मी आणि उद्धव ठाकरे दोघेच मातोश्रीवर होतो. तू काय सांगू शकतोस? त्यामुळे माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट झाली पाहिजे. तुझा काय संबंध? तू काय मातोश्रीचा मालक झाला काय? कातुला उद्धव ठाकरेंनी निम्मा हिस्सा दिला आहे. याबाबतही खुलासा होण्याची गरज आहे.
रामदास कदमांनी कोणावर नार्को टेस्टची मागणी केली?
अनिल परब यांच्यावर.
प्रश्न 2 : कदमांनी परब यांच्यावर कोणते आरोप केले?
बिल्डरांकडून पैसे घेणे आणि एसआरए प्रकल्पांतील गैरव्यवहार.
प्रश्न 3 : बाळासाहेब ठाकरे यांच्या ठशांबाबत काय वाद आहे?
हाताचे की पायाचे ठसे घेतले, याबाबत संभ्रम आणि आरोप.
प्रश्न 4 : रामदास कदमांनी स्वतःबाबत काय मागणी केली?
स्वतःची आणि उद्धव ठाकरेंचीही नार्को टेस्ट व्हावी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.