Anil Parab Exclusive : 'भाजपमध्ये निष्ठावंतांचा अपमान, आयात नेत्यांचा बोलबाला'; अनिल परब यांनी नाराज नेत्यांची यादीच सांगितली

BJP loyal leaders insulted News : ओरिजनल भाजपचा जो कार्यकर्ता आहे. त्यांच्यासोबत आम्ही काम केले आहे. त्यामुळे निष्ठावंत नेते इतके दुखी आहेत की भाजपकडे बघताना त्यांचा दृष्टिकोन बदलेला आहे.
Anil Parab
Anil ParabSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. मात्र, निष्ठावंत मंडळींना संधी दिली जात नसल्याने पक्षात मोठी नाराजी आहे. प्रत्येक पक्षाला त्याचा पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. बाहेरचे लोक घेण्याचा त्यांना अधिकार आहे. मात्र, हे करीत असताना पक्षातील नेत्यांवरच अन्याय केला जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार व माजी मंत्री अनिल परब यांनी "सरकारनामा"शी बोलताना केला. यावेळी त्यांनी भाजपमधील नाराज नेत्यांची नावेच सांगितली आहेत.

ओरिजनल भाजपचा (BJP) जो कार्यकर्ता आहे. त्यांच्यासोबत आम्ही काम केले आहे. त्यामुळे निष्ठावंत नेते इतके दुखी आहेत की भाजपकडे बघताना त्यांचा दृष्टिकोन बदलेला आहे. भाजपमध्ये सध्या 35 टक्के ओरिजनल तर 65 टक्के आयात केलेले कार्यकर्ते असा फॉर्म्युला आहे. ज्यांनी पक्षासाठी दिवस-रात्र काम केले. ज्यांनी त्याकाळी आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केले. ज्या मंडळींनी पक्षासाठी सतरंज्या उचलल्या. त्यांना दूर करण्याचे काम केले जात असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला आहे.

Anil Parab
BJP Politics : वोट चोरीच्या वादात बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य, थेट नागपूर महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांचा आकडाच जाहीर केला

भाजपने ज्येष्ठ नेते असलेल्या माधव भंडारी यांना आतापर्यंत काय दिले? मधू चव्हाण यांना एकदा आमदारकी दिली आहे. त्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी प्रयत्न केले होते. शिवसेनेच्या कोट्यात आलेली आमदारकी बाळासाहेबांनी त्यावेळी मधू चव्हाण यांना दिली होती. त्यावेळी महाजन साहेबांनी ही जागा देण्याची विनंती केली होती. त्यातच आज कित्येक जण मंत्रिमंडळाच्या बाहेर आहेत. त्यामध्ये संजय कुटे यांच्यासारखा विदर्भातील चेहरा मंत्रिमंडळात नाही, त्यामुळे भाजपमधीलच मंडळींना त्याचे दुःख होत असल्याची टीका अनिल परब (Anil Pararb) यांनी केली.

Anil Parab
Ajit Pawar Politics : भुजबळांचे चिमटे, दादांनी हळूच फडणवीसांकडे पास केला चेंडू

त्यासोबतच गेल्या काही वर्षांत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सर्वांवर आरोप केले. ते सोमय्या कुठे गेले. त्यांना ही दूर ठेवण्यात आले आहे. विशेषतः सर्व जवळच्या नेत्यांना लांब केले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या जवळ इतर पक्षातील आयात असलेले नेते मंडळीच दिसत आहे. त्याचे दुःख पक्षातील अनेक नेत्यांना होत असल्याचा दावाही यावेळी परब यांनी केला.

Anil Parab
Vijay Wadettivar On election Commission : निवडणूक आयोग चित्र-विचित्र; चोरीची तक्रार करणाऱ्यांनाच मागतो पुरावे; वडेट्टीवारांचा संताप

ज्या नेत्यांनी आयुष्यभर पक्षासाठी कष्ट घेतले आहे. त्यांना पक्षांनी काहीच दिले नाही. पक्षासाठी नेहमीच काम करणारे माधव भांडारी यांना पक्षाने काहीही दिले नाही. निष्ठावंत मंडळींना डावलले जात आहे. आता नव्याने आलेल्या उपऱ्या मंडळींना संधी दिली जात आहे. त्यांना विधानपरिषदेवर घेऊन मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. त्यामुळेच भाजपमधील नेत्यांना याचे दुःख होत आहे.

Anil Parab
NCP Politics : राष्ट्रवादीचं ठरलंय! युतीचं डोक्यातून काढून टाका अन् जिथे आपली ताकद तिथे उमेदवार द्या...

भाजप व शिवसेना पक्ष एकत्रित आल्याने भाजपच्या कार्यकर्त्याचे नुकसान होत आहे का ? असा सवाल विचारण्यात आल्यानंतर परब म्हणाले, 'भाजपला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले. त्यांना 132 जागा मिळाल्या होत्या. बहुमतासाठी केवळ 12 जागा त्यांना हव्या होत्या. त्यासाठी 12 अपक्ष आमदारांची जुळवाजुळव केल्यास स्वतःच्या ताकदीवर भाजपला सरकार स्थापन करता आली असते. त्यानंतर 43 मंत्री भाजपचे झाले असते. जे आज केवळ 20 वर थांबेल आहेत. त्यांना आज 23 मंत्रिपद अजून वाढून मिळाले असते, असेही परब म्हणाले.

Anil Parab
Rahul Gandhi court statement: मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका; राहुल गांधींनी कोर्टात दिली लेखी माहिती

आज त्यांचे कित्येक नेते मंत्रिमंडळाच्या बाहेर आहेत. संजय कुटे यांच्यासारखा विदर्भातील चेहरा मंत्रिमंडळात नाही. कित्येक नावे आहेत जे की दिवस-रात्र त्यांनी भाजपच्या वाढीसाठी प्रयत्न केले आहेत. या मंडळीने भाजपसाठी मोठे कष्ट घेतले आहेत. आज तेच लोक मंत्रिमंडळाच्या बाहेर आहेत. स्वतःच्या कार्यकर्त्यावर देखील अन्याय केला असल्याचा आरोप माजी मंत्री अनिल परब यांनी केला.

Anil Parab
Shivsena UBT News: उद्धव ठाकरे जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीला झुंजवणार, 'असे' आहे प्लॅनिंग!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com