मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांची औरंगाबागमध्ये सभा झाली तर दूसरीकडे मुंबईमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीही सभा झाली. बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती असा सवाल काल देवेंद्र फडणवीस यांनी केला. या प्रश्नाला आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.
संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना उत्तर?
अजून किती दिवस तुम्ही बाबरीवर बोलणार आहात, देशात महागाई, बेरोजगारी, चीनची घुसखोरी सारखे प्रश्न आहेत. पण यावरून लक्ष हटवण्यासाठी हनुमान चालिसा, बाबरी भाजपचे लोक आणि त्यांचे मित्रपक्ष सातत्याने बोलत आहेत. लोकांचे प्र्श्न पाहा ना काय आहेत, देशात बेरोजगारी वाढली आहे, महगाईचा विस्फोट झाला आहे. चीनच्या सीमेवर लोक घुसले आहेत, त्यांना दम द्या, त्यांना बोला, आणि जर विषय बाबरीचा असेल जर कोणी म्हणत असतील की बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती, तर त्यांनी त्यांच्याच पक्षाचे तेव्हाचे नेते सुंदर सिंह भंडारी यांना जाऊन विचारावं शिवसेना कुठे होती, अशा शब्दात संजय राऊत यांनी फडणवीसांना उत्तर दिलं आहे.
तसेच, त्याकाळतला सीबीआय, गुप्तचर यंत्रणाांचा अहवाल तापासावा, त्यातून त्यांना कळेल की त्यावेळी शिवसेना नक्की कुठे होती आणि शिवसेना काय करत होती. तो विषय संपलेला आहेस, तरी तो विषय का काढताय, राम मंदिर उभं राहतयं वातावरण बदललं आहे, अशावेळी मूळ प्रश्नावरचं लक्ष दूर करण्यासाठी भाजप आणि त्यांचे छुपे साथीदार या विषयाकडे लोकांना आकर्षित करत आहेत." असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
''भोंगे हा विषय महत्त्वाचा नाही, भोंग्यांपेक्षा महत्त्वाचे विषय आज देशात आहेत पण या भोंग्यांमागची पॉवर कोणची आहे. हे देशाला माहित आहे. हे हिंदूत्त्व नाही, हा कायद्याचा विषय आहे, कायदा मोडणाऱ्यांवर कायद्याने काय करता येईल, हा उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि पोलीस यंत्रणांचा विषय आहे. तुम्हाला आता काहीच काम नसल्यानं तुम्ही या विषयावर बोलत असाल तर तुम्ही महाराष्ट्राचं आणि देशाचं वातावरण खराब करत आहात. स्वतच्या राजकीय स्वार्थासाठी हे राष्ट्रहिताचं नाही. भोंग्यामुळे लोकांना त्रास होऊ नये अशी आमची स्वत"ची इच्छा आहे. सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या देशात जर कायद्याचे राज्य असेल तर प्रत्येकाने कायद्याच पालन करायला हवं, असही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.