Uddhav Thackeray : ठाकरेंच्या सभांना गर्दी; शिवसेना मंत्र्यांने 'कॉर्नर सभा' म्हणून उडवली खिल्ली

Uday Samant criticizes Uddhav Thackeray: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला प्रारंभ करताना रत्नागिरी इथं घेतलेल्या सभेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्र्यांनी केली टीका.
Uddhav Thackeray 1
Uddhav Thackeray 1Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कालच्या रत्नागिरी सभेची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंची सभा ही कॉर्नर सभा, अशी खिल्ली उडवली.

"रिफायनरी बारसुमध्ये व्हावी, यासाठी केंद्राला पत्र लिहिणारे उद्धव ठाकरे अन् आता तेच रिफायनरी रद्दची भूमिका घेत आहेत. मतदान आल्यानंतर पक्षाची भूमिका, कशी बदलू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे", असा टोला देखील उदय सामंत यांनी लगावला.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रत्नागिरीमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराला प्रारंभ केला. रत्नागिरीमध्ये पहिली सभा घेतली. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे 18 नोव्हेंबरपर्यंत 36 सभा घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पहिल्या सभेनंतर, लगेचच शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी टीका केली. उद्धव ठाकरेंच्या दुहेरी भूमिकेवर बोट ठेवले. रत्नागिरीतील रिफायनरीवर उद्धव ठाकरे कसे भूमिका बदलत आहे, याकडे उदय सामंत यांनी लक्ष वेधले.

Uddhav Thackeray 1
Kedar Dighe : केदार दिघेंचा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला फोन, सुरवातीला आरोप नंतर संतापले...

उदय सामंत म्हणाले, "यांचेच पक्षाचे विद्यमान उमेदवार रिफायनरीचं समर्थन करतात, तर माजी खासदार हे विरोध करतात. मतदान आल्यानंतर पक्षाची भूमिका, कशी बदलू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे". राष्ट्रवादीतून (NCP) त्यांच्याकडे गेलो, तेव्हा माझी सुस्ती केली. मंत्री झालो, तेव्हा चांगला ठरलो. पण एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेल्यावर मी वाईट झालो. ही रिफायनरीच्या विरोधाची दुसरी बाजू आहे, असेही उदय सामंत यांनी म्हटले.

Uddhav Thackeray 1
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचं महाविकास आघाडीला आव्हान! अडीच वर्षांच्या कारभाराचा हिशेब द्या ?

"आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करता, पण स्वतः मुख्यमंत्री असताना तुमचे चिरंजीव पर्यावरण मंत्री होते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही दोन भाऊ आमदार होतोय हे त्यांना दुःख होत आहे. आम्ही सर्वसामान्यातून मोठं झाल्याने काही लोकांना पोटशूळ आहे", असेही उदय सामंत यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com