Gandhi-Yadav Prayagraj Rally : गर्दीच्या अतिउत्साहाचे करायचे काय? नेते, कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न...

Uttar Pradesh Incident News : प्रयागराज जिल्ह्यात राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या जाहीर सभांमध्ये अनियंत्रित झालेली गर्दी चिंता वाढवणारी आहे. कार्यकर्ते, लोकांच्या अशा अतिउत्साहाला आवर घालण्यासाठी वेळीच उपाय योजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
Rahul Gandhi-Akhilesh Yadav Rally
Rahul Gandhi-Akhilesh Yadav RallySarkarnama

Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांच्या सभांना मोठी गर्दी होते. या गर्दीवर नियंत्रण ठेवणे कधी कधी पोलिसांनाही अवघड होऊन जाते. त्यामुळे लोकांसह नेत्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. असाच प्रकार राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या 19 मे रोजीच्या उत्तरप्रदेशातील सभांमध्ये घडला. यावर काय उपाययोजना करता येतील, याबात सर्वपक्षीय नेत्यांनी विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. मतदानाचा पाचवा टप्पा आज ( ता. 20 मे) पूर्ण होईल. त्यानंतर आणखी दोन टप्प्यांचे मतदान होऊन चार जून रोजी निकाल लागणार आहे. यादरम्यान सत्ताधारी एनडीए (NDA) आणि विरोधी इंडिया आघाडीच्या (India Aghadi) नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे.

नेत्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत आहे. कार्यकर्त्यांना आपला नेता काय बोलतो, याची उत्सुकता असते. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे, हाही अशा सभांचा हेतू असतो. रखरखत्या उन्हातही या निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांच्या सभांना कार्यकर्ते आणि लोकांनी प्रचंड गर्दी (Crowd) केल्याचे दिसून आले. मात्र या गर्दीवर नियंत्रणासाठी अद्यापही पारंपरिक पद्धतीचाच उपयोग केला जात आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rahul Gandhi-Akhilesh Yadav Rally
Thackeray Voting to Congress : उद्धव ठाकरेंनी आघाडीधर्म निभावला; प्रथमच केले काँग्रेसला मतदान...

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) रविवारी घडलेला प्रकार सर्वच पक्षांना चिंतेत टाकणारा आहे. प्रयागराज जिल्ह्यातील फूलपूर येथे राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर प्रयागराज येथेही सभा आयोजित करण्यात आली होती.

या दोन्ही सभांना अभूतपूर्व अशी गर्दी झाली होती. फुलपूर येथील सभेत गर्दी अनियंत्रित झाली. राहुल गांधी यांचा सभास्थळी हेलिकॉप्टरने आगमन झाले. राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांचे भाषण होणार होते, मात्र गर्दी अनियंत्रित झाल्यामुळे ते भाषण न करताच परत निघाले.

राहुल गांधी यांचे आगमन झाल्यानंतर जमाव अनियंत्रित झाला. पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडून कार्यकर्ते, लोकांनी व्यासपीठाकडे धाव घेतली. त्यामुळे दोन्ही नेते भाषण न करताच तेथून निघून गेले.

या दोन्ही नेत्यांच्या सभांना झालेली गर्दी लाखोंच्या संख्येत असावी, असे दिसते. या गर्दीच्या उत्साहाचे करायचे काय, असा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर राजकीय व्यवस्थेकडेही नसणार. आपल्या नेत्याला प्रत्यक्ष भेटता यावे, अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते. प्रत्येकाचीच इच्छा पूर्ण होईल, याची अजिबात शक्यता नसते.

रखरखीत उन्हात प्रचारसभांना गर्दी जमवण्यासाठी या निवडणुकीत सर्वच पक्षांना कसरत करावी लागली. गर्दी जमते किंवा गर्दी व्हावी, अशी व्यवस्था राजकीय नेत्यांना करावी लागते. सुरक्षेचा सर्व भार पोलिस यंत्रणेवर असतो.

गर्दी लाखोंची आणि काही शेकड्यामंध्ये पोलिस... ही विसंगतीच म्हणावी लागेल. गर्दी अनियंत्रित झाली तर त्याचे करायचे काय, ती नियंत्रित कशी करायची, याबाबत राजकीय पक्षांनी पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे.

Rahul Gandhi-Akhilesh Yadav Rally
IAS Tukaram Munde : तुम्हाला माहित आहे का तुकाराम मुंडेंनी मतदान केले का...? आणि कुठे...?

सभेला येणाऱ्या कार्यकर्त्यांनी अंगी शिस्त बाळगण्याची सवय लावायला हवी. अशा अतिउत्साहामुळे झाली तर अडचणच होईल, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. प्रयागराज जिल्ह्यातील दोन्ही सभा कायकर्ते, नेते आणि प्रशासकीय यंत्रणेच्या डोळ्यांत अंजन घालणाऱ्या आहेत.

या सर्वांनी आता खडबडून जागे होत पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. दुर्घटना झाल्याशिवाय आपल्या यंत्रणेला जाग येत नाही, असे सतत बोलले जाते. या वेळी तसे होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे.

काही जबाबदाऱ्या पुन्हा नव्याने निश्चित केल्या पाहिजेत. सभांना अशी प्रचंड गर्दी होत असेल तर राजकीय पक्षांनीही त्यावर विचार करायला हवा. संबंधित भागात सभा आणखी विभागून घेता येतील का, याचाही विचार केला पाहिजे.

मात्र सभांना गर्दी व्हावी, यासाठी आटापिटा करणाऱ्या राजकीय पक्षांकडून या पर्यायावर विचार होण्याची शक्यता कमीच आहे. सर्व पक्षांनी मिळून गर्दीवर नियंत्रणासाठी धोरण ठरवण्याची आवश्यकता आहे.

Edited By : Vijay Dudhale

Rahul Gandhi-Akhilesh Yadav Rally
Shantigiri Maharaj Latest News : शांतिगिरी महाराजांनी मतदान यंत्राला घातला फुलांचा हार; गुन्हा दाखल होण्याची शक्यता

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com