
Kolhapur, 29 August : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी (ता. 28 ऑगस्ट) पत्रकारांशी बोलताना ‘महाडिक यांनी महायुती म्हणून संयम राखावा, त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही,’ याची दक्षता घेण्याचे आवाहन केले. त्यावरून गोकुळ दूध संघाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी मंत्री मुश्रीफ यांना चांगलेच ठणकावले आहे.
गोकुळ दूध संघाच्या राजकारणात महायुती (Mahayuti) म्हणून एकत्र येत असताना मिठाचा खडा मी टाकणार नाही. पण, त्यांनीही महाविकास आघाडीच्या नेत्यांना किती जवळ करायचे, हे ठरवावे लागेल त्यांनाही हा नियम लागू आहे आणि माझ्या शंकांचे निरसनही करावे’, अशी प्रतिक्रया संचालिका शौमिका महाडिक यांनी दिली आहे.
मी दरवर्षीप्रमाणे सर्वसाधारण सभेपूर्वी पत्रकार परिषद घेणार आहे, त्यात माझे काही अनुत्तरित प्रश्न आहेत, जे यापूर्वीच मी त्यांना विचारले आहेत. या अनुत्तरित प्रश्नांच्या उत्तरांची वाट बघेन, नाही तर माझी भूमिका मी स्पष्ट करेन. महायुतीत खडा पडेल असे मी तरी काही वागणार नाही. पण, हा नियम त्यांनाही तेवढाच लागू पडतो, असेही शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांनी ठणकावले आहे.
महाडिक म्हणाल्या, ‘महायुती म्हणता तर मी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देणे बंधनकारक आहे. संचालक म्हणून जर प्रश्न विचारत असेल तर त्याची उत्तरे द्यावीत, ही माझी अपेक्षा आहे. महायुतीत खडा पडेल असे तेही वागणार नाहीत आणि माझ्या सर्व शंकाचे निरसन करतील.
गोकुळ सहकारी दूध संघामध्ये महायुती असेल तर सर्वसाधारण सभेला महायुतीचेच नेते येणार. त्या नेत्यांना गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षांसह सर्वांनी किंवा प्रशासनाने सन्मानाने बसवायला पाहिजे, अशीही मागणी शौमिका महाडिक यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.