Mumbai News : वडील विरुद्ध मुलगा...! राज्याचे लक्ष वेधून घेणारी लढत कुठे आहे बघा…

Ramdas Kadam 2014 आणि 2019 ला शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या गजानन किर्तीकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्याविषयी रामदास कदम यांचा मुख्य विरोध आहे
Gajanan Kirtikar, Amol Kirtikar
Gajanan Kirtikar, Amol KirtikarSarkarnama
Published on
Updated on

- संजय परब

Mumbai News : वायव्य मुंबई या लोकसभा मतदारसंघातील लढत राज्याचे लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे. कारण या ठिकाणी वडिलांविरोधात मुलगा उभा टाकलाय. तुमच्या एव्हाना लक्षात आले असेल : गजानन किर्तीकर विरुद्ध अमोल किर्तीकर अशी ही लढत असणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अमोल किर्तीकर यांची उमेदवारी निश्चित झाली आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून गजानन किर्तीकर तिसऱ्यांदा खासदार होण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.

उमेदवारी निश्चित झाल्याने अमोल किर्तीकर यांच्याकडून संपर्क अभियान सुरू आहे, तर दुसरीकडे गजानन किर्तीकर पुन्हा निवडणुकीच्या जुळवाजुळवीला लागले आहेत. याच मुद्द्यावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी गजानन किर्तीकर यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. हा विरोध करताना त्यांनी आपले चिरंजीव सिद्धेश कदम यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.

Gajanan Kirtikar, Amol Kirtikar
Mumbai High Court On Dhangar Reservation: मुंबई हायकोर्टाचा धनगर समाजाला मोठा धक्का; आरक्षणाबद्दलची याचिका फेटाळली

सिद्धेश कदम यांच्या नावाने विविध कार्यक्रमांसाठीची बॅनरबाजीदेखील सुरू झाली आहे. अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी त्यांच्या मागे सध्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची टांगती तलवार त्यांच्यावर आहे. 2014 आणि 2019 ला शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या गजानन किर्तीकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्याविषयी रामदास कदम यांचा मुख्य विरोध आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तो वडील आणि मुलगा यांच्यातील ही लढत लुटूपुटूची असेल. वडील मोठ्या ताकदीने आपल्या मुलाचा मुकाबला करू शकणार नाहीत. परिणामी ही लढत आरामात अमोल जिंकून उद्धव ठाकरे सेनेची आयती भर होईल, या कारणाने. गजानन किर्तीकर यांनी आपल्या समकालीन सहकारी कदम यांच्या या कारणाचा खरपूस समाचार घेताना त्यांना आपल्या या मतदारसंघात नाक खुपसण्याची गरज नसल्याचे सुनावले होते.

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांपैकी मुंबई वायव्य हा एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. या लोकसभा मतदारसंघात मराठी मतदारांसह अन्य भाषिक मतदारांची मोठी संख्या आहे. त्याशिवाय विविध धर्मीय मतदार आहेत. या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती यांचे समसमान वर्चस्व दिसून येते. 2009 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतरच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार गुरुदास कामत यांनी शिवसेनेचे उमेदवार गजानन किर्तीकर यांचा 38,387 मतांनी पराभव केला.

त्यानंतर 2014 मध्ये मोदी लाटेत गजानन किर्तीकर यांनी एकतर्फी विजय मिळवताना 51.77 टक्के मिळवत 1,83,028 मतांनी कामत यांचा पराभव केला. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत किर्तीकर यांनी आपल्या मताधिक्यात मोठी वाढ केली. गजानन किर्तीकर यांनी एकतर्फी विजय मिळवला. या निवडणुकीत काँग्रेसकडून संजय निरुपम उभे होते. 2019च्या विधानसभा निवडणुकीत या लोकसभा मतदारसंघाच्या अखत्यारीत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांत तीन भाजप आणि तीन शिवसेना असे उमेदवार विजयी झाले होते.

Gajanan Kirtikar, Amol Kirtikar
Kadam Vs Kirtikar : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर रामदास कदमांचे एक पाऊल मागे; म्हणाले, 'कीर्तिकरांसोबतचा वाद...'

बदललेल्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर या मतदारसंघांतील समीकरणातही बदल झाला आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर या लोकसभेतील तिन्ही आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकर हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांची ईडीकडून कथित गैरव्यवहारप्रकरणी चौकशी सुरू आहे.

तर दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू आणि अंधेरी पूर्वच्या आमदार ऋतुजा लटके या ठाकरे यांच्यासोबत आहेत. लटके या ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेल्या पहिल्या आमदार ठरल्यात. हा मतदारसंघ संमिश्र लोकवस्तीचा आहे. मराठी मतदारांप्रमाणे उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. काही विधानसभा मतदारसंघांत अल्पसंख्य समुदाय आहे. त्यामुळे भाषिक-धार्मिक कल लक्षात घेता हा मतदारसंघ संमिश्र आहे. मराठी मतांची तुलना करता अन्य भाषिक मतदारांची संख्या अधिक भरते.

महाविकास आघाडीमुळे काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि डावे-समाजवादी मते एकत्र येतील, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या महायुतीमध्ये भाजपवर मोठी जबाबदारी असणार आहे. या लोकसभा मतदारसंघात भाजपकडे तीन आमदार आहेत. ही त्यांची जमेची बाजू आहे. महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर ही पहिलीच मोठी निवडणूक आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी आपली सर्वसमावेशक नेता असल्याची छाप उमटवली आहे. त्याशिवाय आता शिवसेना ठाकरेंसोबत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि समाजवादी-डाव्यांच्या मतांची कुमक असणार आहे. त्यामुळे ही लढत कोणालाही एकतर्फी होणार नाही हे स्पष्ट आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Gajanan Kirtikar, Amol Kirtikar
BMC Mumbai : 'बीएमसी'त घोटाळा; ठाकरेंनी डागली शिंदे-फडणवीसांवर तोफ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com