Mumbai News : धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गासोबत नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्या, अशी मागणी करत चार विविध याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. आता हायकोर्टाने राज्यातील एस. टी.आरक्षणापासून प्रवर्गातून आरक्षण देण्यास स्पष्ट नकार दर्शवला आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मराठा, ओबीसी समाजात आरक्षणाच्या मुद्द्यांवरुन संघर्षाची ठिणगी पडली आहे.आंदोलने, मोर्चे, सभा, मेळावे, बैठका यांनी वातावरण तापवलं जात असून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आव्हानही दिले जात आहे. यामुळे सरकारची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.याचदरम्यान,धनगर समाजाकडून देखील अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे,यासाठी ठिकठिकाणी आंदोलन आणि मोर्चे काढत आक्रमक पवित्रा घेतला होता.पण आता हायकोर्टाने धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधीच्या याचिका फेटाळल्या आहेत. (Maratha - OBC Reservation)
धनगर समाजाला आता भटक्या जमाती प्रवर्गातून साडेतीन टक्क्यांचे आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे अनुसूचित प्रवर्गातून आरक्षण दिले गेले तर धनगर समाजाचे आरक्षण ७ टक्क्यांवर पोहचले असते. मात्र,न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल काथा यांच्या खंडपीठाने धनगर समाजाच्या याचिका फेटाळली आहे. (Mumbai High Court)
यावेळी न्यायालयाने धनगर समाजाला अनुसूचित जातींचे आरक्षण देण्यासाठी पूर्तता आणि पडताळणीचे निकष पूर्ण होत नसल्याचे कारण दिले आहे. तसेच धनगर समाजाची अनुसूचित प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी योग्य नसल्याचे स्पष्ट करत ती मान्य करता येणार नाही असेही नमूद केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुंबई उच्च न्यायालयात वंचित असलेला समाज ‘धनगड’ की ‘धनगर’ आहे, यावर निकाल वाचन करण्यात आले. काळेकर समितीनं 1956 मध्ये दिलेल्या अहवालानुसार राज्यात ‘धनगड’ जातीचा उल्लेख निर्माण झाला आहे. एवढ्याच पुराव्याच्या आधारावर राज्यातील धनगर समाज आरक्षणापासून वंचित असल्याचे म्हटले होते. मात्र, देशातील एकाही संस्थेकडे ‘धनगड’ संवर्गातील घटक राज्यात वास्तव्यास असल्याचा पुरावा उपलब्ध नाही असेही यात म्हटलं आहे.(Dhangar Reservation)
धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गासोबत नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्या, अशी मागणी करत चार विविध याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. भारत अगेन्स्ट करप्शन या संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याच मुद्द्यावर राणी अहिल्यादेवी समाज प्रबोधिनी मंच , ईश्वर ठोंबरे आणि पुरुषाेत्तम धाखोले यांनी तीन स्वतंत्र रीट याचिका दाखल केल्या होत्या.
(Edited By Deepak Kulkarni)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.