आराधना बिल्डरच्या 'त्या' जाहिरातीवर आव्हाडांचा आक्षेप; म्हणाले..

जाहिरातीमध्ये महिलांसाठी सेल्स आणि मार्केटिंग या पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी कॅाग्रेसचे (NCP) नेते व राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) गृहविकास मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ठाण्यातील आराधना बिल्डरच्या एका जाहीरातीवर आज (ता.13 फेब्रुवारी) आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी या बिल्डरची जाहिरात ट्विट करत त्या जाहिरातीच्या एका निकषावर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या या ट्विटची दिवसभरापासून चांगलीच चर्चा होत आहे.

 Jitendra Awhad
संभाजीराजे छत्रपतींची पुढील दिशा ठरली! घेतला मोठा निर्णय....

आव्हाड यांनी ही जाहिरात ट्विटरवर पोस्ट करतांना काहील प्रश्न विचारले आहे. ते म्हणाले की, "हा जातीभेद नाही का? आणि आम्ही बहुजन समाजाची बाजू घेतली की गुन्हेगार" अश्या मोचक्या शब्दात त्यांनी या जाहिरातीच्या माध्यमाद्वारे करण्यात येत असलेल्या जातीवादावर प्रश्न उपस्थित केला आहे.

 Jitendra Awhad
दिव्यांगांची व्यथा ऐकून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील झाले अस्वस्थ!

आव्हाडांनी ट्विटरवर शेअर केलेली जाहिरात ही ठाण्यातील 'आराधना बिल्डर्स अँड डेव्हलपर्स'ची आहे. या जाहिरातीमध्ये महिलांसाठी 'सेल्स आणि मार्केटिंग' या पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पदासाठी कंपनीकडून सहा निकष ठेवण्यात आले आहेत. त्यातीलच एका निकषावर आव्हाडांनी आक्षेप नोंदवला आहे. यामधील तिसऱ्या क्रमांकाच्या निकषात म्हटले आहे की, ब्राह्मण समाजाच्या उमेदवाराला नोकरीसाठी प्राधान्य देण्यात येईल. नेमका याच निकषावर आव्हाडांनी आपला आक्षेप नोंदवत हा जातीभेद नाही का?, असा सवाल विचारला, तर आम्ही बहुजन समाजाची बाजू घेतली की गुन्हेगार होतो, असा सवालही उपस्थित केला आहे. त्यांच्या या ट्विटची चर्चा सोशल मिडियावर सुरू झाली असून अनेकांनी आव्हाडांचे ट्विट शेअर करत आपले मते मांडली आहेत. मात्र, अद्याप कुठल्या राजकीय नेत्याने यावर आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com