Bacchu Kadu: अर्थ खातं माझ्याकडं द्या, पंधरा दिवसांत...; बच्चू कडूंचं अजितदादांना थेट आव्हान

Bacchu Kadu: पण अद्याप कुठलीही ठोस घोषणा सरकारनं केलेली नसल्यानं विरोधकांसह स्थानिक शेतकरीही आक्रमक झाले आहेत.
Ajit Pawar-Bacchu Kadu
Ajit Pawar-Bacchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Bacchu Kadu: राज्यातील मराठवाडा, अहिल्यानगर आणि सोलापूर या भागात मुसळधार पावसानं गेल्या तीन ते चार दिवसांपासून थैमान घातलं होतं. यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्राणहानी आणि वित्तहानी झाली आहे. यापार्श्वभूमीवर सरकारनं नुकसानग्रस्त भागातील जनतेला भरीव मदत तसंच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

पण अद्याप कुठलीही ठोस घोषणा सरकारनं केलेली नसल्यानं विरोधकांसह स्थानिक शेतकरीही आक्रमक झाले आहेत. यावरुनच आता बच्चू कडू यांनी अर्थमंत्री अजित पवार यांना घेरलं आहे. अर्थ खातं माझ्याकडं द्या मी पंधरा दिवसांत तुम्हाला काम करुन दाखवतो अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांना थेट आव्हान दिलं आहे.

Ajit Pawar-Bacchu Kadu
Aryan Khan: आर्यन खान पुन्हा समीर वानखेडेंच्या रडारवर! आता थेट दिल्ली हायकोर्टात होणार फैसला

बच्चू कडू म्हणाले, पैशांचं सोंग आणता येत नाही असं अजित पवार शेतकऱ्यांना सांगत आहेत. मग पहाटे शपथ घेण्यासाठी सोंग करता आलं का? जमत नसेल तर सोडा खुर्ची, फक्त 15 दिवस वित्त विभागाचा कारभार माझ्याकडं द्या, पंधरा दिवसात सगळं ओके करून दाखवतो. आमदारांचे दोन-तीन महिने पगार बंद केले आणि ते पैसे शेतकऱ्याच्या घरी नेऊन ठेवले तरी हा विषय सुटू शकतो. डीपीडीसीला दिले जाणारे 200 कोटी रुपये थांबवा. आमदारांचे, क्लास वन अधिकाऱ्यांचे पगार थांबवा, कलेक्टरला एक-दोन महिने पगार नाही दिला तर तो काही उपाशी मरणार नाही. एक वर्षे पगार थांबला तरी उपाशी राहू शकणार नाही, अशी त्यांची अवस्था आहे. दुष्काळाची झळं सगळ्यांना पोचली पाहिजे सगळ्यांनी ती सहन केली पाहिजे.

Ajit Pawar-Bacchu Kadu
Nagpur NCP: 'अजितदादा जे बोलले तेच मीच बोललो, माझे काय चुकले?'; राष्ट्रवादीतून हकालपट्टी झालेला नेता तटकरेंवरच भडकला

मदत म्हणजे भीक देण्याची अवस्था आहे. आपण भरपाई देत आहे की मदत देत आहोत एकदा निश्चित करा. लागवडीसाठी किमान 50 ते 60 हजार रुपये खर्च लागला. तुमच्या मदतीने तो खर्च निघणार आहे का? आणि ते निघणार नसेल तर त्या मदतीचा काय फायदा? मुख्यमंत्री बनवाबनवी करत आहेत. दुष्काळी परिस्थिती सगळे निकष असताना दुष्काळ का जाहीर करत नाही. जे करायला पाहिजे ते सरकार का कळत नाही? दहा हजार रुपये वाढवून द्या पण दुष्काळ जाहीर करणार नाही. दुष्काळ जाहीर केला की वसुली थांबवावी लागणार म्हणून दुष्काळ जाहीर करत नाही. जिथं पूर गेला तिथली अवस्था बेकार नाही आहे. मराठवड्यापासून तीच अवस्था आहे. केंद्राकडून पैसे मागितले पाहिजेत, गरज पडत असल्यास कर्ज काढले पाहिजे शक्तीपीठ उडाणपूल, कशासाठी पाहिजे दोन मार्ग कमी केले तर सरकारजवळ लाख कोटी सहज वाचू शकतात. कर्जमाफीसाठी 80 हजार कोटीची गरज आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Ajit Pawar-Bacchu Kadu
Jalgaon Police : फेसबुकवरून महिलेशी मैत्री, खोटं लग्न आणि अत्याचार ; जळगाव पोलिसाचं कारस्थान उघड

दरम्यान, उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना बच्चू कडू म्हणाले, कुठल्याही राज्यकर्त्यांनी दौरे करत असताना, विरोधी पक्षात असताना जसं वागतो तसेच सत्तेत असताना सुद्धा भूमिका कायम ठेवल्या पाहिजेत. सत्तेत वेगळं आणि सत्येबाहेर वेगळं असं ठेवू नये चांगल्या भावनेनं समोर गेलं पाहिजे. शेतकऱ्याला सावरता यावं यासाठी आर्थिक मदत केली पाहिजे काही सूट द्यावी लागेल, काही धोरणात्मक घोषणा करावी लागेल. आज दहा हजारांची मदत द्याल आणि उद्या बँकेची कर्ज वसुली सुरू होईल अशा मानसिकतेत शेतकरी जगेल कसा? त्यासाठी जीव वाचवणं गरजेचं आहे.

Ajit Pawar-Bacchu Kadu
Ravindra Chavan : काँग्रेसच्या वडेट्टीवारांनी 6 महिन्यांचे वेतन पुरग्रस्तांना दिले..., भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, सर्वच आमदार गडगंज नाहीत!

तसंच एकनाथ शिंदेंवर निशाणा साधताना बच्चू कडू म्हणाले, अशा पद्धतीने स्टिकर लावून काहीही होणार नाही, तुम्ही धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत, तसंच कीट वाटप करून काहीच होणार नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरस्थितीवर भाष्य करताना सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com