
Mumbai News : बदलापूर येथे ऑगस्ट महिन्यात झालेल्या चिमुरडींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे हा मुख्य आरोपी होता.या घटनेनंतर संतापाची तीव्र लाट उसळली होती. अनेक तास रेल रोको आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र,यातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेच्ं एन्काऊंटर करण्यात आलं होतं.
काही दिवसांपूर्वीच या एन्काऊंटर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई पोलिसांना जबाबदार धरलं आहे.आता याचप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मोठा धक्कादायक दावा केला आहे.यावरुन आता मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे.
मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी शनिवारी(ता.25) मुंबईत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महायुती सरकारसह मुंबई पोलिसांवर जोरदार शाब्दिक हल्ले चढवले. यावेळी त्यांनी अक्षयबाबत लोकं बोलायला तयार नसून घाबरत आहेत. बलात्काराची केस आहे. समाज अंगावर येईल अशी लोकांना भीती वाटत आहे. अरे अक्षय शिंदेने (Akshay Shinde Encounter) बलात्कारच केला नाही. पण बलात्कार केलेल्यांना या प्रकरणातून सोडवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या झाली असं दावा करत आव्हाड यांनी खळबळ उडवून दिली आहे.
आव्हा़ड म्हणाले, अक्षय शिंदेला मारलं आहे.त्याची निर्घृणपणे हत्या झाली.जोव्हा कधी शासकीय यंत्रणा पोलिसांच्या कर्तव्यात हस्तक्षेप करतात,तेव्हा पोलीसच बदनाम होतात. अक्षय शिंदेच्या हाताला बेड्या होत्या.त्याला जवळून मारण्यात आलं.तो कसा रिव्हॉल्वर ओढणार? रिव्हॉल्वर त्याच्या हाताचे ठसेदेखील नाही अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.
आमदार जितेंद्र आव्हाडांनी म्हणाले, मी नेहमी जात-वर्चस्ववादाच्या लढाईवर बोलतो.अचानक अक्षय शिंदे मेल्यावर ते कसे हजर होतात.यातील मोठी गोष्ट म्हणजे माणसाची मेमरी शॉर्ट आहे.विसरून जातील. या एकाच गेमवर लोक खेळतात. अक्षय शिंदेला मारलं, तो माझा मतदारसंघ आहे. तिथे चहावाला आहे.त्याने मला सांगितलं काही तरी लफडा झाला.फायरिंग झाली. लगेच दुपारी सर्व ओपन झालं असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
अक्षय शिंदे याचं एन्काऊंटर नाही नूसून मर्डर आहे, असं जजने सांगूनही आत्तापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल नाही. जाती वगैरे काही नसतात. माणुसकी धर्म मोठा आहे.ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या पाठी उभं राहिलं पाहिजे,त्यांना मदत करायला हवी.सगळीकडेच तुम्ही राजकीय असलंच पाहिजे असं नाही.कराडसारखी वृत्ती आणि सोमनाथ सूर्यवंशीला मारणारी प्रवृत्ती ही विकृती असून त्याविरोधात लढायला हवं अशी रोखठोक भूमिकाही आव्हाड यांनी मांडली.
शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या जनआक्रोश मोर्चात सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्युवरही शंका घेतली.ते म्हणाले, सोमनाथ मेला कसा? त्याच्या मृत्यूचं कारण सांगा? त्याच्या मृत्यूचं ठिकाण कुठे? पण ते कुणीही सांगायला तयार नाही.ज्या इन्स्पेक्टरच्या कस्टडीत मेला असेल तर तो पोलीस अधिकारी अजून सेवेत कसा? अशी विचारणाही त्यांनी केली.ही जातीयवादाची लढाई आहे. मनुवाद वाढत आहे. मुजोर सत्ताधारी मनुवादाला बळ देत आहेत,असा आरोपही आव्हाडांनी यावेळी केला.
राज्यात आका संस्कृती जन्माला आली आहे.हा इथला आका,तो तिथला आका. या सर्व आकांना काकांकडे पाठवा वरती. हे सगळं बंद करायला हवं.नाहीतर यातून महाराष्ट्राचा सत्यानाशच होणार आहे अशी भीतीही जितेंद्र आव्हा़ड यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.