BVA News : आता 'ही' आघाडी उतरणार राज्याच्या राजकारणात; विधानसभेच्या 50 जागा लढण्याची तयारी

Political News : बहुजन विकास आघाडीने विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे.
Bahujan Vikas Aghadi
Bahujan Vikas AghadiSarkarnama
Published on
Updated on

संदीप पंडित

Political News : तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून केली जात आहे. महायुती व महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसापासून जागावाटपाची चर्चा सुरु आहे. या जागावाटपाच्या चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच आता जागावाटपात काही मतदारसंघात अदलाबदली केली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यातच आता बहुजन विकास आघाडीने विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे.

आतापर्यंतच्या निवडणुकीत पालघर आणि मीरा भाईंदरपर्यंत मर्यदित असलेली बहुजन विकास आघाडी आता थेट राज्याच्या राजकारणात उतरणार आहे. येत्या काळात विधानसभेच्या जवळपास 50 जागा लढविण्याची तयारी सुरु केली आहे. निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी उमेदवारांची शोधशोध सुरु केली आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीत चांगलीच रंगत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. (BVA News)

लोकसभेच्या निवडणुकीत एकला चलो असलेला बहुजन विकास आघाडी (BVA) हा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता. त्यामुळे विधानसभेला महायुती किंवा महाविकास आघाडी यापैकी एका आघाडी बरोबर हा पक्ष जाईल, असे वाटत होते. परंतु आता मात्र या पक्षाने थेट विधानसभेत वेगवेगळ्या भागातून आपले उमेदवार उभे करण्याची तयारी केल्याने त्याचा फटका कोणाला बसतो पाहणे हे औत्सुक्याचे ठरणार आहे.

विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांचे प्रमाण ही वाढत आहे तर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे, असे असले तरी आतापर्यंत आपल्या ताकदीवर ठाणे आणि पालघर जिल्ह्यावर वर्चस्व ठेवणाऱ्या बहुजन विकास आघाडीने मात्र आतापर्यंत आपले अस्तित्व वेगळे जपले होते.

Bahujan Vikas Aghadi
Jayant Patil News : जयंत पाटलांचे मोठं विधान; म्हणाले, 'चंदगडमध्ये नवा चेहरा...'

कोणत्या एका आघाडी किंवा युती बरोबर न गेल्याने त्याचा त्यांना फटका ही त्यांना निवडणुकीत बसला असला तरी त्यांनी आतापर्यंत थेट निवडणुकीपूर्वी कोणत्या आघाडी किंवा युतीकडून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले नाहीत. त्यामुळे बहुजन विकास आघाडी स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

राज्यातील निवडणुकीत बहुजन विकास आघाडी वेगवेगळ्या भागातून जवळपास 50 जागा लढविणार आहे. पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, पुणे, नगर, विदर्भ, सातारा आदी भागातून आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती बहुजन विकास आघाडीच्या सूत्रांने दिली.

गेल्या कित्येक निवडणुकीत राज्याच्या वेगवेगळ्या भागातून उमेदवारीसाठी साकडे घालण्यात येत होते. त्याला आता मुहूर्त मिळाला आहे. राज्याच्या निवडणुकीमध्ये उमेदवार निवडून येणारे आहेत. त्यामुळे महायुती आणि आघाडी दोन्हीकडे खळबळ उडाली आहे.

Bahujan Vikas Aghadi
Amol Kolhe News : लक्षात ठेवा वेळ तुमची असेल तर येणारा काळ आमचाच; अमोल कोल्हेंनी दिला इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com