Bala Nandgaonkar: "...तर मी राज ठाकरेंसोबत गेलोच नसतो"; बाळा नांदगावकरांनी सांगितलं एकनिष्ठतेमागचं कारण

Bala Nandgaonkar: शिवसेनेत असताना आणि नंतर शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरही बाळा नांदगावकर हे राज ठाकरेंसोबत राहिले ते अद्यापही सोबतच आहेत.
Bala Nandgaonkar
Bala Nandgaonkar
Published on
Updated on

Bala Nandgaonkar: शिवसेनेत असताना आणि नंतर राज ठाकरेंसोबत मनसेत आल्यानंतरही बाळा नांदगावकर आमदार राहिले. मनसेच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत पक्षाचे १३ आमदार निवडून आले, सध्या हे सर्वच्या सर्व आमदार मनसेची साथ सोडून इतर पक्षांमध्ये गेले आहेत. केवळ बाळा नांदगावकर हे एकमेव अद्यापही राज ठाकरेंसोबत आहेत. राज ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहण्यामागचं नेमकं कारण काय आहे? हे स्वतः नांदगावकर यांनी सांगितलं आहे. साम टीव्हीच्या 'ब्लॅक अँड व्हाईट' या मुलाखतीच्या कार्यक्रमात त्यांनी ही आतली गोष्ट सांगितली आहे.

Bala Nandgaonkar
Bala Nandagaonkar: मुंबईतल्या फक्त 27 टक्के मराठी माणसांच्या जीवावर मनसे-शिवसेनेची सत्ता कशी येणार? बाळा नांदगावकरांनी सांगितलं गणित

नांदगावकर एकनिष्ठ कसे राहिले?

नांदगावकर सांगतात मी ठाकरे कुटुंबाला मानणारा व्यक्ती आहे. माझी नाळ ही बाळासाहेबांशी आणि ठाकरे परिवाराशी जोडलेली आहे. उद्धव ठाकरेंशी माझे वाईट संबंध नाहीत, अत्यंत चांगले जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते कुठेही कार्यक्रमाला भेटले तरी आमचा नमस्कार वैगरे होत असतो. पण राज ठाकरेंसोबत माझं भावनिक नात आहे. या भावनिक नात्यासोबत माझी निष्ठा मी त्यांच्यासोबत दिलेली आहे. त्यामुळं शिवसेनेनंतर मी दुसऱ्या कुठल्या पक्षात गेलोय का? तर ठाकरे कुटुंबासोबतच आहे. कारण माझी नाळ ठाकरे कुटुंबाशी जोडलेली आहे.

Bala Nandgaonkar
Housing Society Security: सोसायट्यांमध्ये आता प्रवेश नोंदणी, बायोमेट्रिक अनिवार्य? कोंढव्यातील अत्याचाराच्या घटनेनंतर सरकारची नवी नियमावली

पण तेच जर राज ठाकरे इतर कुठल्या पक्षासोबत गेले असते तर मी राज ठाकरेंसोबत गेलोच नसतो. मी बाळासाहेबांच्या मूळ पक्षात राहिलो असतो. कारण मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो होता ना! असंही नाही की मी बाळासाहेबांना सांगितलंच नव्हतं. तेव्हा उद्धव ठाकरे देखील होते तिथं. त्यामुळं मी त्या कुटुंबाचा हितचिंतक म्हणा किंवा जीव ओवाळून टाकणारा असा कार्यकर्ता आहे. त्यामुळं मी राज ठाकरेंसोबत आहेत.

Bala Nandgaonkar
Urban Naxal: आषाढी वारीत 'अर्बन नक्षल'! सरकारला नेमकी भीती कशाची?

कारण त्या काळात उद्धव ठाकरे कुठेही नव्हते. त्यावेळी माझं नगरसेवकाचं तिकीट असो किंवा आमदारकीचं तिकीट असो, या सर्व गोष्टींसाठी राज ठाकरे माझ्या पाठिशी उभे राहिले होते. इतकंच नाही तर छगन भुजबळांविरोधात जेव्हा मी आमदारकीची निवडणूक लढवली तेव्हा मला जी काही मदत लागली तेव्हा ती राज ठाकरेंनीच दिली होती. कुठेतरी या गोष्टीची जाणीव असली पाहिजे त्यामुळं मी राज ठाकरेंचा काही प्रवास हा समोरुन बघत होतो. त्यामुळं मला राज ठाकरेंसोबत जाणं गरजेचं आहे, अशा शब्दांत आपल्या एकनिष्ठतेबाबत बाळा नांदगावर यांनी सविस्तर भूमिका मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com