शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' नाव; चिन्ह...

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मशाल चिन्ह मिळाले आहे.
Uddhav Thackeray, Eknath Shinde Latest News
Uddhav Thackeray, Eknath Shinde Latest NewsSarkarnama

Shiv Sena : शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाच नाव तात्पुरत गोठवण्यात आल्याने अंधेरी पोट निवडणुकीसाठी शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटांकडून नवीन चिन्ह आणि नवीन नावे ही निवडणूक आयोगाकडे सुचवण्यात आली होती. यामध्ये आता निवडणूक आयोगाने निर्णय दिला असून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मशाल चिन्ह मिळाले आहे.

तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे नाव देण्यात आले आहे. शिंदे गटाला (बाळासाहेबांची शिवसेना) असे नाव देण्यात आले आहे. मात्र, त्यांना कोणतेही चिन्ह मिळालेले नाही. त्यांना आयोगाने पुन्हा चिन्हांसाठी पर्याय देण्यास सांगितले आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde Latest News
ठाकरेंच्या याचिकेविरोधात एकनाथ शिंंदेंचीही दिल्ली हायकोर्टात धाव; ‘आमचं म्हणणं ऐकून घ्या’

शिंदे गटाने निवडणूक आयोगाला तीन चिन्ह दिली होती. त्यामध्ये गदा, त्रिशूळ आणि उगवता सुर्य असे पर्याय सुचवले होते. ठाकरे गटानेही तीन पर्याय दिले होते. त्यामध्ये त्रिशूळ, मशाल, आणि उगवता सूर्य असे पर्याय होते. निवडणूक आयोगाने गदा आणि त्रिशूळ हे चिन्ह बाद केले. कारण धार्मीक चिन्ह देता येत नाही. त्यामुळे ते चिन्ह नाकारले.

Uddhav Thackeray, Eknath Shinde Latest News
मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह मिळालं... आणि नावं...

उगवता सूर्य हे चिन्ह ठाकरे आणि शिंदे यांनी दिले होते. त्यामुळे ते आयोगाने नाकारले असावे, असे सांगितले जात आहे. शिंदे यांना आता पुन्हा तीन पर्याय द्यावे लागणार आहेत. त्यामुळे आता शिंदे गटाला कोणते चिन्ह मिळते हे पाहावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com