पुणे : शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाच नाव तात्पुरत गोठवण्यात आल्याने अंधेरी पोट निवडणूकीसाठी शिवसेना आणि शिंदे गटांकडून नवीन चिन्ह आणि नवीन नावे ही निवडणूक आयोगाकडे मागवण्यात आली होती. त्यानुसार त्यांना उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या वतीने देण्यात आली होती.
यावर आता आयोगाने निर्णय दिला असून उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या तीन चिन्हापैकी मशाल हे चिन्ह त्यांना मिळालं आल आहे. याबरोबरच शिवसेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाव दिले आहे.
तर शिंदे गटाने दिलेले तिन्ही चिन्हांचे पर्यांयापैकी कुठलेही चिन्ह त्यांना देण्यात आले नाही. त्यांना नवीन तीन चिन्ह सुचवायला सांगितले आहेत. मात्र आज पक्षाचं नाव दिलं असून बाळासाहेबांची शिवसेना असे नाव देण्यात आले आहे. (Eknath Shinde-Uddhav Thackeray)
काल उद्धव ठाकरे यांनी निवडणुक आयोगाला तीन नावे आणि चिन्हांचे पर्याय दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील निवडणूक आयोगाला तीन नावे आणि तीन चिन्हे सादर करण्यात आली होती. यामध्ये शिंदे यांनीही ठाकरे यांच्याप्रमाणे त्रिशूळ आणि उगवत्या सूर्याची मागणी केली होती. तर तिसरा पर्याय म्हणून गदा देण्यात आली होती. नावातही शिंदे यांनी बाळासाहेबांचे नाव दिले होते. त्यामुळे कोणते नाव कुणाला मिळते, याबाबत उत्सुकता लागली होती.
दरम्यान, एकनाथ शिंदे गटाकडून पक्षाच्या नावाचे ३ पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केले होते. त्यात शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना बाळासाहेबांची या नावांचा समावेश होता त्यापैकी बाळासाहेबांची शिवसेना हे नाव त्यांना मिळालं आहे. तर शिंदे यांनी निवडणूक चिन्हासाठी त्रिशूल, उगवता सूर्य आणि गदा हे तीन पर्याय निवडणूक आयोगाला सादर केले होते त्यापैकी कुठलेही चिन्ह त्यांना मिळालं नसून नवीन चिन्ह सुचवायला सांगितले आहे.
यामध्ये विशेष म्हणजे पहिले दोन पयार्य ठाकरे यांच्याकडून देण्यात आलेलेच होते. त्यामुळे ही दोन्ही चिन्हे या दोन्ही गटाला मिळण्याची शक्यता कमी होती. नेमके तसेच घडले आहेत.
ठाकरे यांच्याकडून शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे ही तीन नावे निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली होती. तर चिन्हांसाठी त्रिशूल, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल ह्या चिन्हांचा पर्याय दिला होता त्यापैकी त्रिशूळ आणि गदा हे दोन चिन्ह धार्मिक कारण देत आयोगाने नाकारले होते. त्यानंतर शिंदे गटाला नवीन चिन्ह सुचवायला सांगितले आहे. आता शिंदे काय पर्याय सुचवतात आणि कुठलं चिन्ह मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.