Pawar Vs Vikhe : पवार कुटुंबीयांचा नगरकडे ओढा का?; सुजय विखेंनी सांगितले कारण...

Sujay Vikhe Patil News : महाराष्ट्रात मुंबई सोडून नगर जिल्ह्यात सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी येऊन गेले आहेत.
Parth Pawar-Rohit Pawar-Sujay Vikhe Patil
Parth Pawar-Rohit Pawar-Sujay Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Nagar News : नगर जिल्ह्यात आज वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांची नगर जिल्ह्यात सर्वत्र चर्चा आहे. ज्याची चकली सरळ, त्यांच्या दिवाळी फराळाला आपण जाणार, असे भाष्य भाजप खासदार सुजय विखे यांनी केले आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे आज नगर जिल्ह्यात दिवाळी फराळासाठी येत आहेत, यावरही खासदार सुजय विखे यांनी मार्मिक टिप्पणी केली. (Why the Pawar family frequents the Nagar : Sujay Vikhe told this reason)

नगर जिल्ह्यात दिवाळी फराळासाठी पार्थ पवार येत आहेत. यावर सुजय विखे म्हणाले की, ‘नगर जिल्हा आमच्या सरकारच्या काळात पर्यटनाच्या दृष्टीने खूप पुढे गेला आहे. महाराष्ट्रात मुंबई सोडून नगर जिल्ह्यात सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी येऊन गेले आहेत. मुख्यमंत्री, पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री हे नगर जिल्ह्यात येऊन गेले आहेत. मुख्यमंत्री तर पाच वेळा नगर जिल्ह्यात येऊन गेले आहेत.’

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Parth Pawar-Rohit Pawar-Sujay Vikhe Patil
OBC Melava : 'तुम्ही तुमच्या हिशेबात राहा, ओबीसीला हिशेबात ठेवा'; ओबीसी नेत्याचा इशारा

नगर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सत्ता आल्यापासून खूप मेहनत घेतली आहे. तसे त्यांचे प्रयत्नही अजून चालू आहेत. हा त्याचाच परिणाम असून, पवार कुटुंबातील सगळे सदस्य नगर जिल्ह्याकडे येत आहेत. आमच्या प्रयत्नांचे हे एक प्रकारे यशच आहे, अशी खोचक टिप्पणीही विखेंनी केली.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला अनेक लोकप्रतिनिधी गैरहजर होते. यावर सुजय विखे यांनी भाष्य केले आहे, ते म्हणाले की, प्रत्येक लोकप्रतिनिधींना पूर्वनियोजित कार्यक्रम असतात. काही अडचणी असतात. आपापल्या कार्यक्रमानुसार ते येतात. दोन लोकप्रतिनिधी दिवाळी फराळाच्या कार्यक्रमांमध्ये आहेत. भाजप आमदार मोनिका राजळे या काही अडचणींमुळे येऊ शकत नाहीत. तशी त्यांनी पूर्वकल्पना दिली होती.

आमदारांची अनुपस्थिती म्हणजे, ते पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या कामावर समाधानी आहेत. निधीचे चांगले वाटप झाल्याचे हे संकेत आहेत. आम्ही मागण्यासाठी काहीच ठेवले नाही. मागण्या नसतील तर ते येथे येऊन काय करणार? असेही खासदार विखे म्हणाले.

Parth Pawar-Rohit Pawar-Sujay Vikhe Patil
Konkan Graduate Constituency : भाजपच्या निरंजन डावखरेंना मनसेचे अभिजित पानसे देणार टक्कर?, खुद्द ठाकरेंनी घेतली निवडणूक हाती

नगर जिल्हा नियोजन समितीला आमदार न येणे म्हणजे जिल्हा शांत आहे. निधी वाटप चांगले झाले आहे. आमदार समाधानी आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. म्हणजेच पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली पक्षविरहित नगर जिल्ह्याचा कारभार सुरू आहे. या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनेक नवीन विषय समोर आले आहेत, त्यावर कार्यवाहीचे नियोजन पण करण्यात आल्याचे खासदार विखे यांनी सांगितले.

Parth Pawar-Rohit Pawar-Sujay Vikhe Patil
Manoj Jarange Patil News : ‘येवलेकरांनो सावध राहा, येणारा काळ कसोटीचा’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com