Konkan graduate Election : 'फॉर्म कसा भरायचा, मतदान कसं करायचं'; राज ठाकरेंनी घेतला मनसैनिकांचा वर्ग

MNS News : कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच, असा चंग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बांधला आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Thane News : कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच, असा चंग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बांधला आहे. त्यासाठी खुद्द पक्षप्रमुख राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे यांनी आज (ता. १६ नोव्हेंबर) ठाण्यात येऊन फॉर्म कसा भरायचा यापासून मतदान कसे करावे, इथपर्यंत पक्ष पदाधिकाऱ्यांचा शब्दशः वर्ग घेतला. (Raj Thackeray reviewed the election of Konkan graduate constituency )

राज्यातील सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. मनसेने लोकसभेबरोबरच कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूकही जिंकण्यासाठी मार्चेबांधणी केली आहे. त्या अनुषंगाने मनसे प्रमुख राज ठाकरे हे आज ठाण्याच्या दौऱ्यावर होते. त्यांना पक्ष पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतानाही कोकण पदवीधर निवडणुकीवरच जोर दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raj Thackeray
ShahajiBapu Patil News : निवडणुकीत जिंकणं महत्त्वाचं, मताधिक्याला मी महत्त्व देत नाही; शहाजीबापू पाटलांचे विधान

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, नवी मुंबई, पालघर येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांना मतदानाबाबत मार्गदर्शन केले. पदवीधर मतदारसंघाची निवडणूक कशी लढवायची, त्याबाबतचा फॉर्म कसा भरला जातो, पदवीधरसाठी मतदान कसे करावे आदींसह इतर महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी पदाधिकाऱ्यांची शाळा घेतली.

कोकण मतदारसंघात येणाऱ्या शहरांतील पदाधिकाऱ्यांनी किती पदवीधरांचे फॉर्म भरले, याची माहितीही राज ठाकरे यांनी घेतली. ही माहिती घेण्याबरोबरच फार्म कसे भरले जातात याबाबत मार्गदर्शन केले, तसेच पदवीधर मतदारसंघाची निवडणूक कशा पद्धतीने लढवावी. प्रत्यक्ष निवडणुकीत मतदान कसे करावे, मतदारांना कशा पद्धतीने जागरूक केले पाहिजे, यासंदर्भातही राज यांनी पदाधिकाऱ्यांना माहिती दिली.

Raj Thackeray
Pawar Vs Vikhe : पवार कुटुंबीयांचा नगरकडे ओढा का?; सुजय विखेंनी सांगितले कारण...

कोकण पदवीधर निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, नवी मुंबई, पालघर आदी भागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठक आयोजित करण्यात आली होती. पदवीधर निवडणुकीसंदर्भात बोलत असतानाच टोल नाक्याबाबत लवकरच बैठक होणार आहे, असे संकेतही राज यांनी या वेळी दिले.

Raj Thackeray
Konkan Graduate Constituency : भाजपच्या निरंजन डावखरेंना मनसेचे अभिजित पानसे देणार टक्कर?, खुद्द ठाकरेंनी घेतली निवडणूक हाती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com