"बाळासाहेबांच्या दुश्मनांचा उद्धव ठाकरेंच्या गळ्यात गळा," : भाजपची टीका

Shivsena : हातात आज मशाल घेण्याची का वेळ आली?
Minister Uddhav Thackeray
Minister Uddhav Thackeray Sarkarnama
Published on: 
Updated on: 

मुंबई : निवडणुक आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्हं गोठवल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू असतानाच आता यात भाजपनेसुद्धा उडी घेतली आहे. दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्ह मिळणार नाही, असा आदेश आयोगाने दिले होते. आता ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह मिळाले. यानंतर भाजपचे आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीसाठी ठाकरे यांच्या शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा दिला. आता याच मुद्द्यावर भाजपने ठाकरेंवर टिका केली आहे. राम कदम यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, "हातात आज मशाल घेण्याची का वेळ आली ? स्वर्गीय बाळासाहेबांनी ज्या काँग्रेस सोबत आयुष्यात कधीही जाणार नाही असे निक्षून सांगितले. जन्मभर त्यांनी काँग्रेस वर कडा प्रहार केला. तेच स्वर्गीय बाळासाहेबांचे दुश्मन आजही, माननीय उद्धवजींना अति प्रिय आहेत. त्यांच्या गळ्याला गळा आहे. "

Minister Uddhav Thackeray
Andheri by-elections|अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय

दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत कॉंग्रेसने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस राज्याचे नेते यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या यांच्या आकस्मित निधनानंतर त्यांची विधानसभेची जागा रिक्त झाली. या जागेसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली असून ३ नोव्हेंबरला या जागेवर मतदान जाहीर केले असून ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.