Bharat Gogawale On Sanjay Raut : राऊतांच्या दाव्याला 'गोगावले स्टाइल' प्रत्युत्तर; म्हणाले, 'त्यांचं रेशन-पाणी संपलंय...'

Bharat Gogawle criticizes Shiv Sena leader MP Sanjay Raut : संजय राऊत यांना आता दिवसा स्वप्नं पडू लागली आहेत.
Bharat Gogawale On Sanjay Raut
Bharat Gogawale On Sanjay Raut Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि खासदार हे भाजपत जाणार, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भाजपने उमेदवारी दिल्यास ते कमळ चिन्हावर निवडणुका लढवतील, असा खळबळजनक दावा राऊतांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात त्याची चर्चा होत आहे. यावर आता शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

Bharat Gogawale On Sanjay Raut
Nitesh Rane Vs Sanjay Raut : संजय राऊत अन् नितेश राणेंनी पातळीच सोडली; थेट अंतर्वस्त्रावरून टीका केली

संजय राऊत यांना आता दिवसा स्वप्नं पडू लागली आहेत. त्यात तुमचा आमचा काही दोष नाही. संजय राऊतांकडे आता दुसरं काही रेशन - पाणी राहिलेलं नाही. त्यामुळे ते आता आमच्या आमदारावर बोलत आहेत. त्यांनी स्वत: आपलं उरलं सुरलं सांभाळावं आणि मग दुसऱ्यावर बोलावं, अशा शब्दांत गोगावलेंनी राऊतांना डिवचलं.

Bharat Gogawale On Sanjay Raut
Bharat Gogawale On Thackeray : ठाकरेंसोबत पुन्हा जाणार का ? गोगावले म्हणतात, "राजकारणात काहीही घडू शकतं..."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय म्हणाले होते संजय राऊत ?

"मला मिळालेल्या पक्क्या माहितीनुसार अजित पवार गटाचे बहुतेक आमदार आणि खासदार, तसेच शिंदे गटाचे सर्व आमदार आणि खासदार हे भविष्यात भाजपत प्रवेश करतील. भविष्यात त्यांना भाजपने उमेदवारी दिली. ते कमळ चिन्हावर निवडणुका लढवतील," असे संजय राऊत म्हणाले होते.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com