नाशिकचे भाऊसाहेब डोंबिवलीत सक्रिय; मशालीची व्याख्या सांगत शिंदे गटाला डिवचलं...

Shivsena : भाऊसाहेब चौधरी यांनी लावलेले बॅनर चर्चेचा विषय बनले आहेत.
Dombiwali, Shivsena Latest News
Dombiwali, Shivsena Latest NewsSarkarnama

डोंबिवली : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला मशाल हे नवं चिन्ह मिळालं आहे. याआधीही 1985 साली बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचे ठरविले आणि त्यांची निशाणी मशाल होती. याच आठवणींना उजाळा डोंबिवलीतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे व संजय राऊत यांचे खंदे समर्थक भाऊसाहेब चौधरी यांनी दिला आहे. (Dombiwali, Shivsena Latest News)

Dombiwali, Shivsena Latest News
शिवसेनेचे एकेकाळचे कट्टर विरोधक आता उद्धव ठाकरेंसोबत!

शिवसेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख असलेले चौधरी यांनी डोंबिवलीत बॅनर झळकावित "ललकार उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि निष्ठावंताची" असा संदेश दिला आहे. निष्ठावंतांची या शब्दाचा उल्लेख करत चौधरी यांनी शिंदे गटाला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. पक्षाची नाशिकची जबाबदारी खांद्यावर समर्थपणे पेलल्यानंतर आता भाऊ डोंबिवलीत पुन्हा एकदा सक्रिय होत असल्याचे पहायला मिळत आहे.

शिवसेनेचे नेते व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमचीच खरी असल्याचा दावा केला. त्यानंतर शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेण्यासाठी ठाकरे व शिंदे समर्थक आपापसात भिडले. कल्याण डोंबिवली मध्ये देखील शिंदे गटाला ठाकरे गटातील मोजक्या शिवसैनिकानी टक्कर दिल्याचे आपण पाहिले. त्यानंतर मात्र डोंबिवलीतील ठाकरे गट काहीसा थंडावला असल्याचे पहायला मिळत आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन, मोर्चे करणारी शिवसेना दिसत नाही. याची चर्चा कल्याण डोंबिवली मध्ये प्रकर्षाने सुरू आहे.

Dombiwali, Shivsena Latest News
संजय राऊत भेटल्यावर फक्त तीनच प्रश्न विचारतात...

अंधेरी पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मशाल व शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह मिळाले. यानंतर डोंबिवली शिंदे गटाने जल्लोष केला, मात्र ठाकरे गटाकडून काहीही फारशी हालचाल झालेली दिसली नाही. हे पाहता डोंबिवलीकर व शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी हे डोंबिवलीत सक्रिय होत असल्याचे पहायला मिळत आहे. भाऊ चौधरी यांनी लावलेले बॅनर शहरात चर्चेचा विषय बनले आहेत.

मशाल चिन्ह पक्षाला मिळाले असून या शब्दाची नेमकी उकल करत त्यामागचा मथितार्थ त्यांनी बॅनर वर मांडला आहे.

  • म... महाराष्ट्राच्या अस्मितेची

  • शा..... शान हिंदुत्वाची

  • ल... ललकार उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • आणि निष्ठावंताची.

अशी उकल करत त्यांनी एक प्रकारे विरोधी शिंदे गटाला यातून टोला लगावला आहे.

भाऊ चौधरी हे शिवसेनेतील संजय राऊत यांचे खंदे समर्थक आहेत. शिवसेना कार्यकर्ता, शाखाप्रमुख, विभाग प्रमुख, शहरप्रमुख, परिवहन सभापती आशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पेलल्या आहेत. त्यानंतर त्यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांचा ओढा नाशिककडे जास्त होता. आता डोंबिवलीतील पक्षातील कार्यकर्त्यांना सक्रिय करणे, त्यांचे नेतृत्व करणे यांसारखी जबाबदारी ते पेलताना दिसत आहेत.

Dombiwali, Shivsena Latest News
Sanjay Raut : आई..मी लवकरच परत येईन...संजय राऊत यांचं आईला भावनिक पत्र...

मशाल चिन्हांविषयी ते म्हणाले, पक्षाला मशाल चिन्ह मिळाले आहे. शिवसेनेकडे या आधीही मशाल चिन्ह होते. छगन भुजबळ नगरसेवक पदासाठी 1985 साली उभे असताना त्यांना मशाल हे चिन्ह मिळाले होते. 2 मार्च 1985 ला विधानसभेची निवडणूक झाली आणि भुजबळ सेनेचे एकमेव आमदार झाले. 1985 साली दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावर महापालिका निवडणूक लढविण्याचे ठरविले आणि मशाल या चिन्हावर सेनेचे 74 नगरसेवक निवडून आले आणि महापालिकेत सेनेची सत्ता आली. भाऊसाहेबांनी त्यावेळी भगवा हाती घेत पक्षाचा मशाल चिन्हाचा प्रचार केला होता याची आठवण त्यांनी यावेळी केली.

डोंबिवलीत पुन्हा सक्रिय झाल्याविषयी भाऊ म्हणाले, नाशिकची जबाबदारी असल्याने मी जास्तीत जास्त नाशिकला असतो. जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा या ठिकाणी शिवसेना वाढीसाठी काम करतो आणि पक्षासाठी जे काही योगदान द्यायचे असेल ते देतो. पक्ष वाढीसाठी ज्या ठिकाणी फिरण्याची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी मी नक्कीच फिरणार आहे, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com