Bhiwandi Loksabha Constituency : भिवंडीच्या जागेवर महाविकास आघाडीचे ठरेना; काँग्रेस -राष्ट्रवादीत चढाओढ

Loksabha Election 2024 :राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच भाजपच्या पाटील यांना खुले आव्हान दिले आहे, तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते नीलेश सांबरे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार असल्याचा दावा करत आहेत.
 nilesh sambare Suresh Mhatre
nilesh sambare Suresh Mhatresarkarnama

शर्मिला वाळुंज

Bhiwandi Political News : महाविकास आघाडीतील जागांचा तिढा सुटत नाही. सांगलीच्या जागेवर मैत्रीपूर्ण लढत देण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत. त्यात आता भिवंडीच्या जागेचे काय होणार? याची काळजी कार्यकर्त्यांना लागली आहे. कारण भिवंडीच्या जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी आपला दावा कायम ठेवला आहे. भाजपने केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे, त्यामुळे भाजपच्या उमेदवाराविरोध कोण लढणार हे चित्र अजून स्पष्ट झालेले नाही.

 nilesh sambare Suresh Mhatre
Lok Sabha Election 2024 : एकनाथ शिंदे लोकसभेचा एक उमेदवार बदलणार; तो उमेदवार मराठवाडा की पश्चिम महाराष्ट्रातील?

राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा (Suresh Mhatre) यांनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच भाजपच्या पाटील यांना खुले आव्हान दिले आहे, तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते नीलेश सांबरे हे काँग्रेसकडून (Congress) उमेदवारी मिळणार असल्याचा दावा करत आहेत. तसेच उमेदवारीसाठी काँग्रेसकडून दयानंद चोरगे यांचे नावदेखील आघाडीवर आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात बदललेल्या सत्तासमीकरणामुळे महायुतीविरोधात महाविकास आघाडी जोरदार टक्कर देईल, अशी चर्चा आहे. मात्र, भिवंडीची जागा कोणाची याचा निर्णय अद्याप महाविकास आघाडीला घेता आला नाही. कपिल पाटील यांना विकासकामांवरून विरोधकांनी आधीपासून कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे यांनी पाटील यांना समोरासमोर येऊन बोलण्याचे खुले आव्हान दिले आहे.

काँग्रेसकडून दयानंद चोरगे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुरेश म्हात्रे उमेदवारीसाठी दावा करत आहेत. त्यात नीलेश सांबरे हेदेखील काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे जागा कोणाची हे ठरण्याआधीच उमेदवारीसाठी चुरस आहे.

मतदारसंघावर महायुतीचे वर्चस्व

भिवंडी मतदारसंघावर महायुतीचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. या मतदारसंघात भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, शहापूर, कल्याण पश्चिम आणि मुरबाड हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये भिवंडी पश्चिम आणि मुरबाडमध्ये भाजपचे दोन आमदार आहेत. शहापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट, भिवंडी पूर्वमध्ये समाजवादी पक्षाचा आमदार आहे. उर्वरित भिवंडी ग्रामीण व कल्याण पश्चिममध्ये शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार आहेत. सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांवर शिवसेना (शिंदे) आणि भाजप महायुतीचे वर्चस्व आहे.

(Edited By Roshan More)

R

 nilesh sambare Suresh Mhatre
Mahadev Jankar Mahayuti : जानकरांनी पवारांना चकवले, महायुतीला मारली कडकडून मिठी, पाहा खास फोटो!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com