Mumbai News: जैन समाजाचं मंदिर पाडलं, अधिकाऱ्याला चुकवावी लागली मोठी किंमत; महापालिका आयुक्तांनी दिले 'हे' महत्त्वाचे आदेश

BMC On Jain Temple : जैन समाजाकडून काढण्यात आलेल्या रॅलीत स्थानिक नेत्यांसह जैनबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. या रॅलीत महिलांचा समावेशही लक्षणीय होता. या रॅलीतील जैन नागरिकांच्या हातात ‘मंदिर तुटा,हौसला नाही’,असे फलक असल्याचेही दिसून आले.
BMC
BMCSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील अनधिकृत सातपीर दर्गा मंगळवारी रात्री हटवण्यात आला. यानंतर त्याठिकाणी दगडफेकीसह जाळपोळीच्या घटना घडली होती.यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तर दुसरीकडे मुंबईतील विलेपार्ले परिसरातील जैन समाजाच्या एका मंदिरावर मुंबई महापालिकेकडून (BMC) कारवाई करण्यात आली होती. पण आता ही कारवाई केलेल्या अधिकाऱ्याला मोठी किंमत चुकवावी लागली आहे.

मुंबई महापालिकेनं मुंबईतील विलेपार्ले परिसरातील पार्श्वनाथ दिगंबर जैन समाजाचं मंदिर दोन दिवसांपूर्वी पाडण्यात आल्यामुळे मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या मंदिर हटवण्याच्या कारवाईनंतर जैन समुदायात मोठा असंतोषाचं पसरला होता. त्यामुळे महापालिकेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी जैन मंदिर पाडणाऱ्या महापालिका अधिकाऱ्याला निलंबित (Suspension) करण्यासंबंधीचे आदेश दिले आहेत.नवनाथ घाडगे असे निलंबन करण्यात आलेल्या महापालिका अधिकाऱ्याचे नाव आहेत.

BMC
Satara Politics : मकरंद पाटलांनी 40 वर्षांचा पैरा फेडला; उदयसिंह उंडाळकरांना हात देत विलासकाकांच्या ऋणातून उतराई

मंदिर पाडण्यात आल्यानंतर जैन समाजाकडून महापालिकेच्या या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी(ता.19) अहिंसक रॅली काढण्यात आली. या रॅलीत कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हेही सहभागी झाले होते.

जैन समाजाकडून काढण्यात आलेल्या रॅलीत स्थानिक नेत्यांसह जैनबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. या रॅलीत महिलांचा समावेशही लक्षणीय होता. या रॅलीतील जैन नागरिकांच्या हातात ‘मंदिर तुटा,हौसला नाही’,असे फलक असल्याचेही दिसून आले. आता महापालिकेनं जैन बांधवांना मोठा दिलासा देताना या मंदिरात पूजा करण्यासाठी परवानगी दिली आहे.

BMC
Rohit Pawar : “फक्त ठाकरे कुटुंबच नाही तर सर्वच कुटुंबांनी…”, रोहित पवारांचे अप्रत्यक्ष अजित पवारांना एकत्र येण्याचं आवाहन

जैन बांधवांनी रॅलीआधी तोडलेल्या मंदिरामध्ये आरती केली, या आरतीनंतर आंदोलन करण्यात आलं. यावेळी उपस्थित जैन आंदोलकांकडून हे मंदिर पुन्हा बांधून देण्याची मोठी मागणीही करण्यात आली. या आंदोलनानंतर काही वेळातच महापालिकेकडून मंदिर पाडणाऱ्या अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.विशेष म्हणजे हे मंदिर 90 वर्ष जुनं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com