
Pune News : सध्या राज्यात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची जोरदार चर्चा रंगली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या सूचक संकेतानंतर उद्धव ठाकरे यांनीही केलेल्या भाष्यानंतर आता या चर्चा सुरू झाल्या आहेत. या दरम्यान या चर्चेवरून अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रियी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली असून माझ्या अंगावर काटा आलाय कारण ही इतक्या आनंदाची आणि समाधानाची गोष्ट असल्याचे म्हटलं आहे. यानंतर आमदार रोहित पवार यांनी देखील यावरून एक सूचक ट्वीट केलं आहे. ज्याची सध्या राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.
राज्याच्या राजकारणात मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार या चर्चेनं धुमाकूळ घातला आहे. सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाबरोबर युतीच्या संदर्भात केलेले वक्तव्य आणि त्यावर उद्धव ठाकरे यांनीही दिलेला सहकार्याची भूमिका यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
यावरून वेगवेगळ्या चर्चा सुरू असतानाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ही प्रतिक्रिया आली. पुण्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी, ही अत्यंत गोड आणि आनंदाची बातमी असून अंगावर काटा आणणारी बातमी आहे. आमचे आणि ठाकरे परिवारात पाच सहा दशकाचे कौटुंबिक संबंध असून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आजही प्रिय आहेत. बाळासाहेब आज हा दिवस बघण्यासाठी असते तर आज आम्हाला खूप आनंद झाला असता, पण असे म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली होती.
दोन्ही पवार एकत्र यावे का? या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना पांडुरंगाची इच्छा असे म्हणत त्यासोबत असणारे नातेसंबंध माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, आजही आणि उद्याही, असे त्यांनी म्हटलं होतं. यानंतर आता रोहित पवार यांनी केलेल्या एका ट्विटमुळे देखील वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
रोहित पवार यांनी, ‘ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं’, असे त्यांनी म्हटलं आहे. यामुळे आता रोहित पवार यांनी अप्रत्यक्ष पणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच सोबत येण्याची साद घातली आहे. सध्या ट्विटची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कही लावले जातायत.
'मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्र द्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण असेल. केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हीत आहे', असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.