Sharad Pawar Vs Ajit Pawar : काका - पुतण्या वादाचा दुसरा अंक ? शरद पवारांपाठोपाठ अजित पवार गटाचंही निवडणूक आयोगाला उत्तर

NCP Dispute News : निवडणूक आयोगाला शरद पवार गटाने दिलेल्या उत्तरात पहिल्यांदाच अपात्र आमदारांचा आकडा समोर येत आहे.
Ncp Crisis News - Ajit Pawar - Sharad Pawar
Ncp Crisis News - Ajit Pawar - Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात जुलै महिन्यात दुसरा मोठा राजकीय भूकंप झाला. शिवसेनेपाठोपाठ वर्षभराच्या कालावधीतच राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली. अजित पवारांसह जवळपास ४० आमदारांनी शरद पवारांची साथ सोडत राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

यानंतर अजित पवारांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासह पक्ष आणि घड्याळ चिन्हावर दावा ठोकला आहे. मात्र, आता राष्ट्रवादीच्या शरद पवार(Sharad Pawar) गटाने अजित पवार गटाचे सगळे दावे फेटाळत अजित पवारांसोबत गेलेल्या ४० आमदारांना अपात्र करा अशी मागणी केली आहे. याचवेळी अजित पवार गटानेही आपले उत्तर सादर केले असल्याची माहिती समोर येत आहे.

Ncp Crisis News - Ajit Pawar - Sharad Pawar
Ramdas Athawale News : मोदींनी फोडली विकासाची हंडी, सांगा कसे होतील प्रधानमंत्री राहुल गांधी ? आठवलेंचा कवितेतून निशाणा...

अजित पवार गटाने दाखल केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासह, पक्ष, चिन्हावर दावा करणारी याचिका दाखल केला होती. त्याची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाला मागील महिन्यात उत्तर देण्यास सांगितले होते. मात्र, शरद पवार गटाने उत्तर देण्यासाठी आयोगाकडे चार महिन्यांचा अवधी मागितला होता. पण निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटाला तीन आठवड्यांचा वेळ देण्यात आला होती. ती मुदत शुक्रवारी संपत आहे.

एकनाथ शिंदेंची बंडखोरी आणि शिवसेनापक्षावरील दाव्यानंतर न्यायालय आणि निवडणूक आयोगात जवळपास वर्षभर लढाई सुरु होती. आता त्याच लढाईची पुनरावृत्ती आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतही सुरू होण्याचे चिन्ह आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्यानंतर अजित पवार गटाने निवडणूक आयोगात याचिका दाखल केली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठकीत निर्णय घेतल्याचे याचिकेत म्हटले आहे.

Ncp Crisis News - Ajit Pawar - Sharad Pawar
Maratha Reservation Movement : देवेंद्र फडणवीसांना जाणूनबुजून खलनायक ठरवलं जातंय; नीलम गोऱ्हेंकडून पाठराखण

शरद पवार गटाने उत्तरात काय म्हटलंय...?

निवडणूक आयोगाला शरद पवार गटाने दिलेल्या उत्तरात पहिल्यांदाच अपात्र आमदारांचा आकडा समोर येत आहे. नऊ मंत्र्यांविरोधात शरद पवार गटाने याचिका दाखल केलेली आहे. नऊ मंत्र्यांशिवाय 31 आमदारांच्या विरोधातही अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आलेली आहे.

अजित पवार गटाचं म्हणणं काय...?

अजित पवार(Ajit Pawar) गटाकडूनही केंद्रीय निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आलं आहे. अजित पवार गटाने आपल्या उत्तरात शिवसेनेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा देखील उल्लेख केला आहे. शिवसेनेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा आणि कायद्याचा सारांशदेखील उत्तरात सांगण्यात आले आहे.

Ncp Crisis News - Ajit Pawar - Sharad Pawar
Mungantiwar Upset In BJP : भाजपची मुंबईत बैठक असताना मुनगंटीवार विमान पकडून चंद्रपूरला पोचले; अनुपस्थितीचे कारण आले पुढे...

तसेच अजित पवार हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. पक्षाचं बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे पक्ष आमचा आहे असा दावा करतानात अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या उत्तरात शिवसेनेच्या निकालाचा दाखलाही दिल्याची माहिती आहे.

शिंदे गटासारखाच दावा

राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) मधील लढाई शिवसेनेसारखीच होताना दिसत आहे. कारण शिवसनेच्या सुनावणीवेळी देखील असेच दावे करण्यात आले होते. अजित पवार यांच्या गटाकडे 40 आमदारांचा पाठिंबा आहे. यातील प्रत्येक आमदार हा लाखो नागरिकांचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे बहुमत आमच्या बाजूने आहे. त्यामुळे पक्षाचं चिन्ह आणि नाव आमच्याकडेच असायला हवं, अशी स्पष्ट भूमिका अजित पवार यांची आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com