Thane News : मनसे नेते व ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मनसे ठाणे शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अविनाश जाधव(Avinash Jadhav)यांनी मुंब्रा डोंगरावर असलेला अनधिकृत दर्गा आणि मशिदीच्या विरोधात आवाज उठवला होता. याचमुळे जाधव यांना ही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणातल्या धमकीचा ऑडिओ संभाषण व्हायरल झालं आहे. या धमकीनंतर ठाण्यातील मनसैनिक आक्रमक झाले आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज्यभरातील अनधिकृत मशिद, मजार आणि दर्ग्याची उभारणीवर भाष्य केलं होतं. तसेच सरकारला अल्टिमेटम देखील दिला होता. त्यानंतर सरकारने तत्परतेने माहिम आणि सांगलीतील मजारवर तातडीने कारवाई करून उद्ध्वस्त केले होते.
काय आहे नेमकं प्रकरण ?
मनसे नेते अविनाश जाधव यांनीही मुंब्रा येथील डोंगरात वनखात्याच्या ताब्यात असलेल्या जागेवरील अनधिकृत दर्ग्याचा प्रकार उघडकीस आणून प्रशासनाला १५ दिवसांत कारवाई करण्याचा अल्टिमेटम दिला होता. याचे पडसाद उमटताच जिल्हा प्रशासन व वनविभागाने मुंब्रा डोंगरावर पाहणी करून चौकशी सुरु केली आहे.
धमकीचं ऑडिओ संभाषण व्हायरल
अविनाश जाधव यांनी मुंब्रा येथील अनधिकृत दर्ग्याच्याविरोधात आवाज उठवल्यानंतर हम उसे जिंदा नही छोडेंगे …कोई गुस्ताख छुप न पाएगा …हम उसे ढुंढ ढुंढ के मारेंगे …अशा आशयाचा ऑडिओ संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.