Jayant Patil
Jayant PatilSarkarnama

Jayant Patil News : मोठी बातमी ! राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या अडचणी वाढणार ; निकटवर्तीय 'ईडी'च्या रडारवर

Maharashtra Political News : '' माझ्या भावाला चार दिवसांपूर्वीच नोटीस आली होती...''

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांनी फास आवळला होता. यात काही नेत्यांना तुरुंगवारीही करावी लागली. यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनादेखील मे महिन्यात ईडी चौकशीला सामोरे जावे लागले होते. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

यानंतर काहीच दिवसांत राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा मोठा गट सहभागी झाला. यापाठीमागे केंद्रीय तपासयंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा टाळण्याचा हेतू असल्याची चर्चा आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Jayant Patil
Thane Hospital News : एका रात्रीत १७ रुग्ण कसे दगावले? रुग्णालय व्यवस्थापनाने केला खुलासा..

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात शनिवारी पुण्यातील बड्या व्यावसायिकाच्या घरी गुप्त भेट झाल्याची बोललं जात आहे. या भेटीत अजित पवार यांच्याकडून शरद पवार यांना सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. मात्र, एकीकडे शरद पवार - अजित पवार(Ajit Pawar)यांच्या भेटीबाबत चर्चांना उधाण आले असतानाच राष्ट्रवादीतील शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या निकटवर्तींना ईडीची नोटीस आली आहे.

जयंत पाटील(Jayant Patil) यांचे बंधू भगतसिंह पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. त्यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे. मुंबईत त्यांचे हॉटेल आहेत. जयसिंगराव पाटील यांच्यासोबत जयंत पाटील यांच्या निकटवर्तीयांनासुध्दा ईडीकडून नोटीस आली आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Jayant Patil
Sanjay Raut Attack Eknath Shinde : आणखी किती दिवस आराम करणार ? मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावर राऊतांचे टीकास्त्र

जयंत पाटील काय म्हणाले?

बंधू भगतसिंह पाटील यांना ईडी(ED Inquiry)ने नोटीस पाठवली आहे. यासंदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले, माझ्या भावाला चार दिवसांपूर्वीच नोटीस आली होती. ईडीने त्यांच्याकडून काही माहिती मागितली होती. ती माहिती त्यांनी दिली. मात्र, शनिवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त बैठकीचा आणि ईडीच्या नोटिशीचा काही संबंध नाही असेही पाटील यावेळी म्हणाले.

अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी बंडाळी केल्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून दोन गट निर्माण झाले आहेत. यात अजित पवार यांच्या गटाने शिंदे - फडणवीस सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. याचवेळी शरद पवार गटात असलेले जयंत पाटील हे देखील भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

तसेच पाटील आणि भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पुण्यात भेट झाल्याची चर्चा समोर आली. पण त्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येत आपण शाह यांची भेट घेतली नसल्याचा खुलासा करत भाजपात जाणार असल्याचे वृत्तही फेटाळले होते.

Jayant Patil
Supriya Sule On Thane Hospital Incident : ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये एका रात्रीत १७ रूग्ण दगावले; सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांना म्हणतात...

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसशी (IL & FS) संबंधित कथित गैरव्यवहाराबाबत ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. तसेच त्चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले असून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com