Aaditya Thackeray Senate Election : आदित्य ठाकरेंना मोठा धक्का ! सिनेटच्या निवडणुकीतील हा 'वजनदार' नेता शिंदेंच्या शिवसेनेत दाखल

Mumbai University Senate Election Breaking Update : सिनेटच्या निवडणुका रद्द केल्यामुळे युवासेना चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते.
Aaditya Thackeray - Senate Election
Aaditya Thackeray - Senate Election Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai : राज्य सरकारच्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठाने १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या सिनेट निवडणुकीला स्थगित दिली आहे. या निर्णयामुळे राजकीय पक्षांसोबतच विद्यार्थी संघटना संतप्त झाल्या आहेत. सिनेट निवडणूक स्थगित झाल्यावरून माजी मंत्री आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. स्थानिक आणि लोकसभा निवडणुकीप्रमाणे मुख्यमंत्री सिनेट निवडणुकीला देखील घाबरले, असा टोला त्यांनी शिंदेंना लगावला होता.

मात्र, आता सिनेट निवडणुका पुढे ढकलल्यामुळे तापलेल्या वातावरणातच आदित्य ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीमधला एक वजनदार नेता असलेल्या प्रवीण पाटकरांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.

Aaditya Thackeray - Senate Election
BJP MLA Ganpat Gaikwad March : सुषमा अंधारे कल्याणमध्ये गेल्या अन् गणपत गायकवाडांचा भाजपला घरचा आहेर

पाटकर हे आदित्य ठाकरेंचे अत्यंत विश्वासू शिलेदार मानले जातात. परंतु त्यांनाच शिंदेंनी आपल्या शिवसेनेत पक्षप्रवेश देत मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत ठाकरेंना मोठा दणका दिला आहे. याचवेळी त्यांच्यासोबत आणखी तीन सदस्य देखील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका रद्द केल्यामुळे आदित्य ठाकरें(Aaditya Thackeray)ची युवासेना चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. मुंबई विद्यापीठाकडून सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम 9 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला होता. 10 सप्टेंबरला निवडणूक आणि 13 सप्टेंबरला निकाल असा हा कार्यक्रम होता.मात्र, व्यवस्थापन परिषदेच्या गुरुवारच्या बैठकीत निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. यावरुन राजकारण ढवळून निघाले आहेत. (Mumbai University Senate Election)

Aaditya Thackeray - Senate Election
Amit Thackeray On Senate Election : 'सिनेट'वरुन अमित ठाकरेंचं सरकारला खुलं आव्हान ; म्हणाले, मैदानातून पळणं हा काही...!

सिनेटच्या निवडणुकांना स्थगिती देण्याच्या निर्णयावरुन आगामी काळात शिंदे - फडणवीस- पवार सरकारविरोधात रान उठवण्याची पूर्ण तयारीत असलेल्या ठाकरे गटाला शिंदे गटाने मोठा धक्का दिला आहे. सिनेटच्या १० सदस्यांपैकी चार सदस्यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. यात प्रवीण पाटकर या सिनेट सदस्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश केला आहे.

ठाकरेंना मोठा फटका बसण्याची शक्यता

युवासेनेतील अंतर्गत कलहामुळे पाटकर यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत थेट शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.मुख्यमंत्री शिंदेंचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पाटकर यांनी प्रवेश केला आहे. प्रवीण पाटकर यांच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरेंना सिनेट निवडणुकांमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिनेट निवडणुकांमध्ये पाटकरांनी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी केली होती. आणि त्याचाच फायदा शिवसेनेला झाला होता.

Aaditya Thackeray - Senate Election
Vijay Wadettiwar In Matoshree : विजय वडेट्टीवार 'मातोश्री'वर; उद्धव ठाकरेंशी काय चर्चा होणार ?

...तरीदेखील निवडणुकीला घाबरतात का ? आदित्य ठाकरेंचा सवाल

ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरेंनी सिनेटच्या निवडणुकीला पुढे ढकलल्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंना (Eknath Shinde) खडे बोल सुनावले होते. ठाकरे म्हणाले, दोन पक्ष फोडले, दोन परिवार फोडले. महाशक्तीसोबत असून निवडणुकीला घाबरतात का? लोकसभेला देखील असेच करण्याची शक्यता आहे.

लोकसभेला देखील निवडणुका जाहीर करतील आणि मग स्थगित करतील. सिनेट तुमचे सरकार पाडणार नाही तुमचे सरकार तर आम्हीच पाडणार आहोत. त्यांची तयारी पूर्ण आहे की नाही माहीत नाही पण तयारी नसेल म्हणून असे झाले असेल, असा टोला आदित्या ठाकरेंनी लगावला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.