Sanjay Raut : संजय राऊतांचा पाय खोलात; पत्राचाळ प्रकरणात मोठी अपडेट

Sanjay Raut News| Patrachal Case| मुलुंडमधील श्रद्धा डेव्हलपर्सच्या कार्यालयातील कागदपत्रं आणि संगणकांच्या तपासात मोठी माहिती उघड
sanjay raut
sanjay rautsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : पत्राचाळ प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. संजय राऊत आणि त्यांचे कुटुंबीय मुंबई पूर्व उपनगरातील एका बिल्डरच्या मालकीच्या दोन गाड्यांचा वापर करत असल्याची माहिती ईडीच्या तपासात समोर आली आहे. १ ऑगस्टला अटक केल्यानंतर ईडीने (ED) संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून आर्थर रोड जेलमध्ये आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांच्या मतदारसंघात श्रद्धा डेव्हलपर्सचे अनेक प्रकल्प आहेत. संजय राऊत आणि त्यांचं कुटुंबीय श्रद्धा डेव्हलपर्सच्या संचालकांच्या मालकीच्या दोन लक्झरी गाड्यांचा वापर करत होते. या प्रकरणाचा तपास करताना मुंबईसह अनेक ठिकाणी ईडीने छापेमारी केली. यावेळी पूर्व उपनगरातील रिअल इस्टेट डेव्हलपरच्या कार्यालयांवरही छापेमारी करण्यात आली. पत्राचाळ प्रकणाचा तपास करताना राऊत आणि त्यांचे कुटुंब श्रद्धा डेव्हलपर्सच्या संचालाकांच्या मालकीच्या गाड्या वापरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली.

sanjay raut
हरिहरेश्वर येथे आढळली संशयास्पद बोट; पोलिसांनी जारी केला हाय अलर्ट

मुलुंडमधील श्रद्धा डेव्हलपर्सच्या कार्यालयातील कागदपत्रं आणि संगणकांची ईडीच्या पथकाने तपासणी केली. सुनील राऊत यांच्या मतदारसंघातील भांडूप, मुलुंड आणि विक्रोळीत श्रद्धा डेव्हलपर्सचे अनेक प्रकल्प सुरु आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या पथकाने बुधवारी अवनी इन्फ्रास्ट्रक्चरवरही छापेमारी केली. ही कंपनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि पत्रा चाळ प्रकरणातील मुख्य आरोपी प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांनी सुरु केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com