Sadabhau Khot News: भाजपच्या घटक पक्षांच्या अपेक्षांवर पाणी फिरले!

Sadabhau Khot unhappy with Ajit Pawar's Move: अजित पवारांच्या बंडाने आता भाजपच्या घटक पक्षांचा हिरमोड झाला आहे.
Sadabhau Khot
Sadabhau KhotSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik News : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड घडवले. त्यामुळे भाजपच्या सहकारी पक्षांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. आता या पक्षांना असलेल्या संधी मिळण्याची शक्यता कमी झाल्याने त्यात नाराजी असल्याचे सुतोवाच माजी मंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकनाथ शिंदे- (Eknath Shinde) भाजप (BJP) सरकारला पाठींबा दिला. त्यामुळे भाजपच्या सहकारी पक्षांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे भाजपचे सहकारी पक्ष नाराज असल्याचे चित्र आहे.

Sadabhau Khot
Sharad Pawar News : छगन भुजबळांच्या समाचारासाठी निवडले २० वर्षांपूर्वीचे `ते` ठिकाण!

श्री. खोत येथे म्हणाले, अनेकांना दुखवून शरद पवारांनी उभारलेली राष्ट्रवादी कॉंग्रेसची माडी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाडली आहे. फडणविसांनी राष्ट्रवादीच्या गवताची पेंडी मोडल्याने ते सैरभैर झाले आहेत.

राज्यातील भाजप सत्तेवर असलेल्या सरकारचा घटकपक्ष म्हणून सदाभाऊ खोत काम करतात. शिंदे, फडणवीस सरकारमध्ये घटकपक्षांना अद्याप स्थान मिळालेले नाही. त्यात आता राष्ट्र्वादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्याने घटक पक्षांच्या अपेक्षांवर पाणी फिरण्याची चिन्हे आहेत, याचा त्यांनी पुनरूच्चार केला.

Sadabhau Khot
Rohit Pawar on Ajit Pawar : तर ते प्रतिभा आजींना विचारल पाहिजे..; अजित पवारांच्या त्या प्रश्नावर रोहित पवार स्पष्टचं बोलले...

ते म्हणाले, सरकार स्थिरस्थावर झाल्यानंतर घटक पक्षांना सामावून घेण्यात येईल असे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. घटकपक्षांसाठी महिन्यातून एकदा बैठकही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपसोबत गेलेल्या पक्षांना भाजपच संपवत असल्याचे बोलले जाते, याविषयी तुम्हाला काय वाटते असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले, कुणीही कुणाला संपवत नाही. प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण विरोधकांनी भाजपच्या बाबतीत असा अपप्रचार करुन ठेवल्यामुळे असे प्रश्न निर्माण होतात. यापूर्वी राज्यात कुठलेही सरकार असले तरी अंमल मात्र बारामतीचा होत होता. राष्ट्रवादीचा हा अश्वमेध फडवणवीसांनी रोखला.

Sadabhau Khot
NCP Crisis : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर नगर भाजप कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल !

आमच्या कोपराला गुळ लावला..

दोन कारखान्यांमधील हवाई अंतराची अट काढून टाकण्याची आम्ही अनेक दिवसांपासून मागणी करत आहोत. त्यासाठी रस्त्यावर उतरल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी आम्हाला हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. पण पुढे काहीच झालेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी फक्त आमच्या कोपराला गुळ लावला आहे, तो खाताही येत नाही आणि चाखताही येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com